Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur : दिवाळीसाठी चक्क साखरेने भरलेला ट्रकच नेला चोरून; चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Nagpur News : मार्केटमध्ये साखर विक्रीसाठी नेण्यासाठी ट्रकमध्ये १५ लाख रुपयांच्या साखरेचे पोत्याचा माल भरला. यानंतर रात्री दहाच्या सुमारास चालकाने ट्रक काटोल नाका चौकात उभा केला. त्यानंतर तो घरी गेला होता

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : स्वतःची दिवाळी चांगली साजरी करता यावी, तसेच शौक पूर्ण करण्यासाठी चोरट्याने दिवाळीच्या तोंडावर चक्क १३५ पोते साखरेचा ट्रकच चोरी करून नेला होता. मात्र पोलिसांनी या चोरट्याला लागलीच अटक केली आहे. त्यामुळे चोरट्याला आता दिवाळी मात्र कारागृहात साजरी करावी लागणार आहे. 

नागपूर शहरात घडलेल्या या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ऋषभ इवनाते असे चोरट्याचे नाव आहे. दरम्यान तक्रारदार धीरज रेहपाडे राहुल ले-आऊट वडधामना हे कार्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीत सुपरवायजर आहेत. कंपनीचा ट्रक चालक जितू वर्मा याने ट्रकमध्ये १५ लाख रुपयांचे साखरेचे पोत्याचा माल भरला होता. यानंतर रात्री दहाच्या सुमारास वर्माने ट्रक काटोल नाका चौकात उभा केला. त्यानंतर तो घरी गेला होता. 

साखरेचा माल असलेला ट्रक लांबविला 

दरम्यान आरोपी ऋषभ याने ट्रकच्या जवळपास कोणी नसल्याची संधी साधून साखरेचा माल भरलेला ट्रक चोरून नेला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास वर्मा हा घटनास्थळी आला असता त्याला ट्रक दिसून आला नाही. ही माहिती त्याने रेहपाडे यांना दिली. यानंतर रेहपाडे यांनी पोलिसात जात घडल्या प्रकारची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

५० लाखाचा मुद्देमाल जप्त 

तक्रार दाखल झायननंतर पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून ऋषभ यास ताब्यात घेतले. तर त्याची सखोल चौकशी केली असता त्याने ट्रक चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ट्रक तसेच साखरेचे पोते असा एकूण ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरट्याला पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT