Nagpur Crime News Saamtv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: नागपुरात भरदिवसा किराणा दुकानदारावर गोळीबार; नेम चुकल्याने अनर्थ टळला, खळबळजनक घटना

Nagpur News: दुकानदार राकेश हेमचंद शाहू यांना आरोपी सन्नी शाहू याने काही दिवसांपूर्वी खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

संजय डाफ

Nagpur Crime News: नागपूर शहरात गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. २ दिवसांपूर्वी शहरात दोन भीषण खूनाच्या घटना समोर आल्या होत्या. या हत्येच्या घटना ताज्या असतानाच शहरात किराणा दुकानात गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपुरात (Nagpur) भर दिवसा किराणा दुकानदारावर फायरिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळमना पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

'किराणा दुकान चालवायचे असेल तर एक लाख रुपये खंडणी द्यावी लागेल' अशी धमकी देत आरोपी सन्नी शाहूकडून गोळीबार करण्यात आला. दुकानदार राकेश हेमचंद शाहू यांना आरोपी सन्नी शाहू याने काही दिवसांपूर्वी खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या विरोधात राकेश शाहू यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याचाच राग मनात ठेवून आरोपीने हा गोळीबार केला.

दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेत आरोपीचा नेम चिकल्याने राकेश शाहू थोडण्यात वाचले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपी सन्नी शाहूला अटक केली आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पेपर फुटी प्रकरणानंतर नीट परीक्षेच्या केंद्रावर परीक्षेवेळी आता पोलिसांची नजर

धक्कादायक! प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; पतीविरोधात गंभीर गुन्हे दाखल

Singer Death: प्रसिद्ध गायकाचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; संगीत विश्वात शोककळा

६ फुटीर खासदारांची काय डील झाली? कोणाला मिळणार मंत्रिपद? संजय राऊतांचा धक्कादायक दावा

टपरीसारखा चहा घरी बनत नाही? मग टाका हा 1 स्वादिष्ट मसाला, न पिणारेही चहा पितील

SCROLL FOR NEXT