Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

धक्‍कादायक..आत्‍महत्‍येचा बनाव करत पित्‍यानेचे मारले मुलीला; दोर गळ्यात टाकून फोटोही काढले

धक्‍कादायक..आत्‍महत्‍येचा बनाव करत पित्‍यानेचे मारले मुलीला; दोर गळ्यात टाकून फोटोही काढले

मंगेश मोहिते

नागपूर : वडील आणि मुलीचे नातं हे अगदी जीवाभावाच आणि प्रेमाचा नातं असते. मात्र (Nagpur News) गुड्डू रज्जक नावाच्या एका पित्यानेच आपल्या दुसऱ्या पत्नीला फसवण्यासाठी स्वतःच्या मुलीच्या आत्महत्येचा (Crime News) बनाव करत मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. (Letest Marathi News)

कळमना पोलीस (Police) स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. आरोपी पित्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुलं आहेत. त्यात सोळा वर्षाची मुलगी ही मोठी आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने दुसर लग्न (Marriage) केले. मात्र पत्नी सोबत न राहता वडिलांच्या घरीच जास्त राहत असल्याने तिला आणि तिच्या परिवाराला धडा शिकविण्यासाठी त्याने मुलीचा सहारा घेतला. मुलीला आत्महत्या करण्याचा बनाव करायला सांगितले.

गळ्यात दोर टाकून काढले फोटो

पित्याने छताला दोर बांधले. गळफास मुलीच्या गळ्यात टाकला आणि फोटो काढले. फोटो काढतानाच त्याने खाली ठेवलेले स्टूल हाताने आणि पायाने सरकवला आणि मुलीचा फास लागून जीव गेला. मात्र त्याने मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. पोलिसात तक्रार सुद्धा दिली. मात्र पोलिसांना यात संशय आला आणि त्यांनी तपास केला असता पित्यानेच मुलीची हत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली.

बलात्‍काराचाही केला होता उल्‍लेख

आरोपी हा विकृत स्वभावाचा असून त्याने आपल्या स्वार्थासाठी मुलीचा जीव घेतला. याआधी सुद्धा अशाच प्रकारे या मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र आता तर त्याने मुलीच्या नावाने तिच्या पाच सुसाईड नोट लिहून ठेवल्या. त्यात त्यांनी त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या भावाने माझ्यावर बलात्कार केला म्हणून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख मुलीला करायला लावल्याचे सुद्धा पोलिसांच्या समोर आले. अशा विकृत आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी मुलीच्या नातेवाईकाने केला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rishi Panchami Bhaji : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली...

Blood Pressure : केळी ब्लड प्रेशरसाठी का फायदेशीर असतात का?

मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात? मित्र पक्षाने सोडली साथ; राजकारणात खळबळ

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

SCROLL FOR NEXT