Brother Killed Sister Lover Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Murder News: प्रियकराने केले विवाहितेचे अश्लील चित्रफित व्हायरल; संतापलेल्या भावाने जे केलं ते कल्पनेच्या पलीकडचं

Brother Killed Sister Lover: नागपूरच्या गंगानगर परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Crime News: नागपूरच्या गंगानगर परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने अश्लील चित्रफित व्हायरल केल्याने चिडलेल्या तरुणीच्या भावाने बहिणीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. नागपूरच्या गिट्टीखदान परिसरात ही घटना घडली आहे. कपिल डोंगरे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कपिल डोंगरे हा अविवाहित असताना त्याचे परिसरातील एका युवती सोबत प्रेम संबंध होते. (Latest Marathi News)

दोघांनी लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र दोघांच्याही कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. त्या युवतीचे दुसऱ्या एका तरुणासोबत लग्न (Marriage)झालं कपिलनेही बालाघाट मधील तरुणीशी लग्न केले. दोघांचाही संसार चांगला सुरू होता.

दरम्यान कपिलने गिट्टीखदान मध्ये मोबाईलचे दुकान टाकले. त्यानंतर त्याने विवाहित प्रेयसीला फोन केला. तिथे एका हॉटेलमध्ये त्याने तिला भेटायल बोलावले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांपूर्वी कपिलच्या मोबाइलमध्ये दुसऱ्या महिलेचे नको त्या अवस्थेत फोटो दिसल्याने कपिलची पत्नी संतापली. त्यावरून पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले. (Nagpur Crime News)

कपिलने अश्लील चित्रफित व्हायरल केल्यानेत्यामुळे त्या तरुणी सोबत तिच्या कुटुंबीयांची ही वस्तीत बदनामी झाली. हा प्रकार असह्य झाल्याने तरुणीच्या भावाने कपिलला जाब विचारला . त्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि तरुणीच्या भावाने कपिलच्या डोक्यावर लाकडी दांड्याने हल्ला चढवला यात कपिलचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्यानेच घटनेची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT