Nagpur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News : ब्रेकअपमुळे प्रियकर संतापला, प्रेयसीच्या घरी जाऊन केलं भयानक कृत्य; नागपुरातील घटना

Nagpur News : तरुणी फोन उचलत नसल्याने तो थेट तिच्या घरात घुसला. त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं.

साम टिव्ही ब्युरो

Nagpur Crime News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातील बहुतेक गुन्हे प्रेमसंबंधातून घडत आहे. प्रेम प्रकरणात कोण कुठल्या थरावर जाईल सांगता येणार नाही. नागपुरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अचानक 'ब्रेकअप' झाल्याने प्रियकर संतापला. तरुणी फोन उचलत नसल्याने तो थेट तिच्या घरात घुसला. त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं. (Latest Marathi News)

प्रियकराचं वागणं बरोबर नसल्याने तरुणीने त्याच्यासोबत ब्रेकअप केलं. तिने त्याचा नंबर देखील ब्लॉक केला. या गोष्टीने प्रियकर चांगलाच भडकला. त्याने थेट तरुणीचं घर गाठलं आणि प्रेम संबंध न ठेवल्याने जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. अचानक गोंधळ झाल्याने तरुणीच्या कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. (Breaking Marathi News)

घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तरुणाला अटक केली. संजू तिवारी (वय १८ वर्ष, रा. रामेश्वरी, शताब्दी चौक) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. संजूचे १९ वर्षीय पीडित तरुणीवर प्रेम होतं. ही तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजू तिवारी हा तरुणीच्या घराशेजारी किरायाने राहत होता. शेजारी असल्याने तरुणी संजूला ओळखत होती. कालांतराने दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. नंतर मैत्री झाली. दोघांचे धागेदोरे जुळले. त्यांचे नाते सुमारे एक वर्ष टिकले. मात्र, दरम्यानच्या काळात तरुणीची दुसऱ्या तरुणाशी मैत्री झाली.

त्यामुळे संतापलेला संजू तरुणीला समजवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तरुणीने त्याचे ऐकले नाही. दरम्यान, संजू हा दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला. त्यानंतर त्याने तरुणीला फोन करणे सुरूच ठेवले. कंटाळून तरुणीने त्याला ब्लॉक केलं.

दरम्यान, तरुणी कॉलेजला जात असताना संजूने तिचा पाठलाग (Nagpur News) सुरू केला. अनेकदा त्याने तिची वाट अडवून तिला बोलण्यास प्रवृत्त केलं. व्यथित झालेल्या मुलीने याबाबत आईला माहिती दिली. यानंतर मुलीच्या आईने आरोपीच्या आईला याबाबत माहिती दिली.

मात्र, त्यानंतरही आरोपीने मुलीचा पाठलाग करून विनयभंग सुरूच ठेवला. १० एप्रिल रोजी आरोपीने मुलीच्या घरासमोर जाऊन मुलीची छेड काढण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर मुलीच्या आईने तत्काळ प्रतापनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली आहे. घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT