Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : नागपुरात सशस्त्र दरोडा; हवेत फायरिंग करत डोक्याला लावली बंदूक, दागिन्यांसह सराफाची कार घेऊन चोरटे पसार

Nagpur News : पिंपळा मार्गावरील निहारिका ज्वेलर्स दुकानाचे मालक मुसळे आणि त्यांचा पुतण्या हे रात्री काम आटोपल्यानंतर दुकान बंद करून घराकडे जाण्यासाठी निघाले होते

Rajesh Sonwane

पराग ढोबळे

नागपुर : नागपूरमध्ये रात्रीच्या सुमारास सोने- चांदीच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. दुकान बंद करून जाणाऱ्या व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या जवळ असलेले सोने- चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व कार घेऊन चोरटे पसार झाले आहेत. सदरची घटना नागपूरच्या पिपळा भागात घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

नागपूर जिल्ह्याच्या पिपळा भागात रवी मुसळे यांचे निहारिका ज्वेलर्स नावाने दुकान आहे. सोने- चांदीचे दागिने विक्री करण्याचे काम मुसळे करत असतात. पिंपळा मार्गावरील निहारिका ज्वेलर्स दुकानाचे मालक मुसळे आणि त्यांचा पुतण्या हे रात्री काम आटोपल्यानंतर दुकान बंद करून घराकडे जाण्यासाठी निघाले होते. रवी हे दुकान बंद करून पुतण्यासोबत सोन्याचे दागिनेची पेटी कारमध्ये ठेवत असतानाच हि घटना घडली. 

सुरवातीला केला हवेत गोळीबार 

दुकान बंद करून गाडीत बसत असतांनाच चोरट्यांनी अचानक हवेत दोन गोळ्या फायरिंग केल्या. त्यानंतर त्यांनी मुसळे यांच्या पुतण्याच्या डोक्याला बंदूक लावून त्याला कारमधून खाली उतरवले. यानंतर सोन्याचे दागिने असलेली पेटी आणि कार घेऊन दरोडेखोर पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सराफ व्यावसायिक भयभीत झाले होते. 

१ किलो सोने, १५ किलो चांदी घेऊन फरार 

बंदुक लावत ज्वेलर्स दुकान मालकाला लुटण्याची घटना बुधवार रात्री घडलेली आहे. या दरोड्यामध्ये सुमारे एक किलो सोने आणि १५ किलो चांदी असा एक कोटी १५ लाखाचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ आली असून अंधाराचा फायदा दरडेकरांनी हा डाव साधला असल्याचा बोलला जात आहे. दरम्यान रात्रीच या प्रकरणात पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

SCROLL FOR NEXT