Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: नागपूर शहर हादरलं! बालपणीच्या मित्राकडून तरुणाचा निर्घृण खून; २४ तासांत दोन हत्येच्या घटना...

Nagpur News: शहरातील पाचपावली आणि एमआयडीसी परिसरात हत्येच्या घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

संजय डाफ

Nagpur Crime News: नागपुर शहरात सातत्याने खून, मारामारी अशी गंभीर प्रकरणे समोर येत आहेत. नुकतीच नागपुरमध्ये अवघ्या २४ तासांत दोन खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. शहरातील पाचपावली आणि एमआयडीसी परिसरात दोन हत्या झाल्या असून या घटनांनी शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपुर (Nagpur) शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. घरगुती वादातून हा संपूर्ण प्रकार घडला असून धारधार शस्त्राने वार करुन पतीने पत्नीचा खून केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

दुसरी हत्येची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. त्रिकोणी प्रेम प्रकरणातून बारसे नगरमध्ये बालपणीच्या मित्रानेच तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. अभिनव महेंद्र राऊत असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून कशीश महाजन असे आरोपीचे नाव आहे.

पोलीस ठाणे उडवण्याची धमकी...

दरम्यान, शहरात एक पोलिस ठाण्यात बॉम्बस्फोट होणार असल्याच्या धमकीचा फोन आल्याने एकच गोंधळ उडाला. नागपुरातील सीताबर्डी (sitabuldi Police Station) पोलिस ठाण्यात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी फोनवरुन देण्यात आली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली असून धमकीनंतर पोलिस ठाणे रिकामे करण्यात आले. मात्र नंतर खोडसाळपणा असल्याचे समोर आले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

मोठी बातमी! महायुतीतील बंडखोर माजी आमदाराचा उमेदवारी अर्ज बाद

पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न? ठाकरे-पवारांसारखा ममतांचाही पक्ष फुटणार? तृणमूलचे 50 आमदार बंडखोरीच्या तयारीत?

पुण्यात रक्तरंजित थरार; चारित्र्याच्या संशयातून 'लिव्ह-इन'मधील तरुणीला निर्घृणपणे संपवलं

SCROLL FOR NEXT