Nagpur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News: धाडसी दरोडा.. वयोवृध्दाला हातपाय बांधून मारहाण करत लुटले ३२ लाख

धाडसी दरोडा.. वयोवृध्दाला हातपाय बांधून मारहाण करत लुटले ३२ लाख

मंगेश मोहिते

नागपूर : नागपुरात इंद्रप्रस्थ लेआऊटमध्ये धाडसी दरोडा टाकत ८० वर्षीय वयोवृध्दाला हातपाय बांधून जखमी करत ३२ लाख रुपयांचा ऐवज घेऊन (Nagpur News) पसार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. सुरेश पोटदुखे असं ८० वर्षीय व्यवसायिकांचे नाव असून त्यांचावर सध्या उपचार सुरू आहेत. प्रकृती ठीक असल्याच सांगितलं जातं आहे. (Latest Marathi News)

नागपूरातील इंद्रप्रथ लेआउट येथे सुरेश पोटदुखे हे एकटेच राहतात. मंगळवारी पहाटे अज्ञात तीन दरोडेखोरांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश केला. त्यानंतर घरात एकटेच असणारे सुरेश पोटदुखे यांना मारहाण करत हातपाय (Crime News) बांधले. लॉकरची चावी मागत त्यांना कमरेखाली चाकूने वार करत जखमी केले. त्यानंतर घरातील ऐवज आणि रोख असा ३२ लाखाचा मुद्देमाल घेऊन पसार झालेत.

जखमी अवस्‍थेत दिला शेजाऱ्यांना आवाज

जखमी सुरेश पोटदुखे हे सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास शेजाऱ्यांना आवाज देत घराचा दारावर आल्यावर ही घटना उघडकीस आली असल्याच स्थानिकानी सांगितले. त्यानंतर सुरेश पोटदुखे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनेगाव पोलिसांनी पंचनामा करत अज्ञात विरुद्ध गुन्हा नोंद करत तपास सुरू केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT