Nagpur Crime News SAAM TV
महाराष्ट्र

Nagpur Crime : पैशांनी भरलेली बॅग घेऊन कारमधून जात होता व्यापारी; इतक्यात मागून दोघे आले अन्...

नागपुरातील यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली.

साम ब्युरो

नागपूर: नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पैशांनी भरलेली बॅग घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याला दोघांनी लुटले. हा व्यापारी कारमधून पैसे घेऊन जात असतानाच, पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यावर कोणत्या तरी जड वस्तूने प्रहार केला. त्यानंतर त्यांच्याजवळील पैसे घेऊन पोबारा केला. (Businessman Robbed in Nagpur)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील (Nagpur) यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. पैशांची बॅग घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याला दोघांनी लुटले. हा व्यापारी कारमधून पैसे घेऊन जात असतानाच, दोघे जण पाठीमागून आले. त्यांनी व्यापाऱ्याच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केले. यात तो व्यापारी जखमी झाला. (Robbery)

जखमी झालेल्या व्यापाऱ्याकडील बॅगमधील २० लाख रुपये (Crime) दोघांनी लुटले. त्यानंतर घटनास्थळावरून दोन्ही आरोपी पसार झाले. यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्दळीच्या रस्त्यावर ही थरारक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर ही घटना घडल्याने पोलिसांचा लुटारूंना धाक नाही का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

भागीदाराचा विश्वासघात करून तब्बल ७६ लाखांचा अपहार

वाळूज औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात तिघांनी भागीदारीत कंपनी सुरू केली. त्यातील एका भागीदाराने अन्य दोघांचा विश्वासघात केला. तब्बल ७६ लाख ५६ हजार ७६२ रुपयांचा अपहार केला. हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Edited by : Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: शाळकरी मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, शौचासाठी घराबाहेर पडली असता अपहरण; नंतर...

Tea Taste : गोड खाल्यावर चहा अळणी का लागतो? तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण

Maharashtra Rain Live News: मराठवाड्यात ऑरेंज आणि यलो अलर्ट,नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! शेवटच्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT