Nagpur Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur: बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार; नागपूर हादरले

Nagpur Crime: नागपूर पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली. या भोंदूबाबाने पूजा करण्याच्या नावाखाली घरी येऊन महिलेवर बलात्कार केला. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • नागपूरमध्ये भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार

  • पूजा करण्याच्या बहाण्याने घरी येऊन केला बलात्कार

  • आरोपीला पोलिसांनी अटक केली

  • नाशिकनंतर नागपूरमध्ये भोंदूबाबाचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ

पराग ढोबळे, नागपूर

नाशिकच्या भोंदूबाबानंतर नागपूरमध्ये देखील असेच प्रकरण समोर आले आहे. पूजा करून आशीर्वाद देतो असे म्हणत नागपूरमधील भोंदूबाबाने महिलेवर बलात्कार केला. आरोपी भोंदूविरोधात महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी यां भोंदूबाबाला अटक केली. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस या भोंदूबाबाची चौकशी करत आहेत. त्यांच्या जाळ्यात आणखी किती महिला अडकल्या आहेत याचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली. पूजा करून आशीर्वाद देण्याच्या नावाखाली या भोंदूने महिलेच्या घरी येत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी नागपूरच्या सक्करदरा पोलिस ठाण्यात बाबाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला आहे. नागपूर पोलिसांनी या भोंदूबाबाला अमरावतीमधून अटक केली. ताहीर बेग (वय ६५ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे.

पीडित महिला खासगी कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिचा नवरा ऑक्टोबर महिन्यापासून बेपत्ता आहे. एका लग्न समारंभात तिची भोंदूबाबाशी ओळख झाली. नवऱ्याला परत आणण्यासाठी पूजा करावी लागेल असे त्याने महिलेला सांगितले. महिलेच्या घरी जाऊन भोंदू बाबाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत सांगितले. महिलेवर अत्याचार केल्यानंतर त्याने तिला धमकी देखील दिली. याची वाच्यता केल्यास देवाचा कोप होईल अशी भीती त्याने दाखवली. मात्र नंतर पीडितीने धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार केली.त्यानंतर पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Power Cut : पावसाळ्यामुळे घरात लाईट वारंवार जाते? तर 'हे Smart Gadgets' ठरतील उपयोगी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT