Tragedy at Watoda Cremation Ground Saam
महाराष्ट्र

चितेजवळ उभे होते; डिझेल टाकताच भडका उडाला; आगीच्या विळख्यात ४ जण सापडले, एकाचा मृत्यू

Tragedy at Watoda Cremation Ground: नागपुरातील वाठोडा दहनघाटातून दुर्देवी घटना उघडकीस. चितेजवळ अचानक उडालेल्या भडक्यामुळे एकाचा मृत्यू, चार जण जखमी.

Bhagyashree Kamble

नागपुरातील वाठोडा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहनघाटात अंत्यसंस्काराच्या विधीवेळी अचानक उडालेल्या भडक्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर, चार नातेवाईक गंभीररित्या जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, वाठोडा परिसरातील रहिवासी सुशीलाबाई हरिभाऊ मुनघाटे (वय वर्ष ८३) यांचे निधन झाले होते. गुरूवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वाठोडा दहनघाटात अंत्यसंस्कार प्रक्रिया सुरू होती. या विधीसाठी कुटुंब उपस्थित होते. दरम्यान, दहन दिल्यानंतर विनोद पुंडलीकराव मुनघाटे (वय वर्ष ६४) हे चितेजवळ उभे होते. यावेळी चितेनं पेट घेण्यासाठी कुणीतरी त्यात डिझेल ओतले.

डिसेल ओतल्यानंतर भडका उडाला. विनोद यांच्यासह चार नातेवाईक गंभीररित्या आगीत भाजले. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, विनोद यांची प्रकृती अधिक बिघडली. त्यांना दुसऱ्या रूग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, बुधवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सध्या चितेवर डिझेल कुणी आणि का ओतले? निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात घडला आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT