Nagpur Corona Update Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Corona Update: नागपुरात ओमिक्रॉनचे तीन नवीन म्युटेशन

आयसीयू मध्ये दाखल असलेल्या सहा रुग्णांच्या नामुन्यांमध्ये पाच रुग्णात बी 1.1. 529 तर एका रुग्णात बी 2 प्रकारचे म्युटेशन आढळले आहे.

संजय डाफ

नागपूर: राज्याबरोबरच नागपूरमध्येही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. आज नागपूर नवीन माहिती समोर आली आहे. नागपुरात ओमिक्रॉन तीन नवीन म्युटेशन आढळून आले आहेत. कोरोना विषाणूचं सातत्याने म्युटेशन होताना दिसत आहे. नागपूरच्या (Nagpur) 'निरी' मध्ये जिनोम सिक्वेन्सिंग सुरु आहे. चौथ्या टप्प्यात 89 जिनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतर तीन म्युटेशन आढळून आले आहेत. यात बी 1.1. 529, बी 1 आणि बी 2 चा समावेश आहे. 89 नमुन्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंग पैकी 62.2 टक्के नामुन्यांमध्ये ओमिक्रॉनचा (Omicron) बी 2, 31.5 टक्के नमुन्यांमध्ये बी 1.1. 529 तर 2.3 टक्क्यांमध्ये बी 1 हा प्रकार आढळून आला आहे.

आयसीयू मध्ये दाखल असलेल्या सहा रुग्णांच्या नामुन्यांमध्ये पाच रुग्णात बी 1.1. 529 तर एका रुग्णात बी 2 प्रकारचे म्युटेशन आढळले आहे. विषाणूतील हा बदल कशा प्रकारे प्रभाव टाकेल याबाबत निरीचे वैज्ञानिकांची तपासणी सुरू आहे. दरम्यान दुसऱ्या लाटेदरम्यान नागपूरमध्ये रुग्णसंख्येने कळस गाठला होता. राज्यात सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. नागपूरमध्येही कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लावले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT