Saam Nagpur
महाराष्ट्र

Nagpur: ऑपरेशन सिंदूरविरोधात धक्कादायक पोस्ट, कॉलेजकडून अॅक्शन; विद्यार्थिनीची हाय कोर्टात धाव

Student Suspended for Anti-Operation Sindhur post: ऑपरेशन सिंदूरविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीला निलंबित करण्यात आले. यानंतर विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

Bhagyashree Kamble

ऑपरेशन सिंदूरनंतर देशासह राज्याचं वातावरण तापलं. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्यस्थिती निर्माण झाली. यानंतर काही देशद्रोह्यांनी पाकिस्तान समाजमाध्यमांद्वारे समर्थन दर्शवलं. आता नागपूरमधूनही काहीसं असंच प्रकरण समोर येत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ विरोधात समाजमाध्यमांवर पोस्ट केल्याच्या प्रकरणात एका विद्यार्थिनीला निलंबित करण्यात आलं आहे. या निलंबनाविरोधात विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

रेझाझ सिद्दिक असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती सिम्बायोसिस विधी महाविद्यालयात एलएलबीच्या पाचव्या सत्रात शिक्षण घेत आहे. केरळमधील रहिवासी असलेल्या रेझाझने ‘ऑपरेशन सिंदूर’विरोधात तिच्या सोशल मिडिया खात्यावर वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती, अशी माहिती समोर आली आहे. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तिला तातडीने अटक करण्यात आली.

तपासादरम्यान, संबंधित विद्यार्थिनी ही एलएलबीच्या पाचव्या सत्रात शिक्षण घेत होती आणि तिचाही सहभाग असल्याचा संशय आल्यामुळे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तपासात काही बाबी समोर आल्यानंतर, महाविद्यालय प्रशासनाने तिला तात्काळ निलंबित केले. विद्यार्थिनीने यावर आक्षेप घेत, न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालयाने २५ मेपर्यंत चौकशी पूर्ण करून २७ मे रोजी न्यायालयात अहवाल सादर करण्याचे निर्देश महाविद्यालयाला दिले आहेत.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, शैक्षणिक क्षेत्रात आणि समाजमाध्यमांवर चर्चा रंगली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT