Devendra Fadnavis News  saam tv
महाराष्ट्र

Devendra fadanvis Case: निवडणूक शपथपत्र प्रकरण; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोषमुक्त

Devendra Fadanvis News: २०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात दोन गुन्ह्याची नोंद केली नव्हती. या प्रकरणी न्यायालयीन लढा सुरू होता.

डॉ. माधव सावरगावे

Devendra fadanvis News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीतील उमेदवारी अर्जात दोन गुन्हे दडवल्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल दोन गुन्ह्यांची माहिती दडवल्याप्रकरणी याचिका अ‍ॅड. सतीश उके यांनी दाखल केली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये दोन गुन्ह्यांची माहिती दडवल्याचा दावा या याचिकेमध्ये केला होता. याप्रकरणी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संग्राम जाधव यांनी सर्व पक्षांची बाजू ऐकूण घेत देवेंद्र फडणवीस यांना क्लिनचिट दिली.

या निकालाची सुनावणी करताना न्यायालयाने 'फडणवीस यांनी जाणीवपूर्वक हे दोन गुन्हे लपविले असे दिसून येत नाही, त्यामुळं त्यांना दोषमुक्त करत असल्याचा निकाल दिला. तसेच फडणवीस यांच्याविरोधातील दोन गुन्हे हे खाजगी स्वरुपाच्या होते. जे गुन्हे लपवले त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मत न्यायालयाने मांडले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

हृदयद्रावक! सर्पदंशाने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; कुटुंबीयांनी सापच आणला रुग्णालयात

Chanakya Niti : चाणक्यांच्या या 6 सायलेन्स स्टॅटर्जी शत्रूला करतील कमजोर

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील पेडी नदी पुलावर भीषण अपघात

Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, १४ दिवसांसाठी जमावबंदी; काय सुरू अन् काय बंद?

SCROLL FOR NEXT