ATS officials conduct investigation following major crackdown on alleged terror recruitment network operating through a football club in Nagpur Saam Tv
महाराष्ट्र

नागपुरात दहशतवादाचा क्लब, दहशतवादी कारवायांसाठी उच्चशिक्षितांचे ब्रेनवॉशिंग

Nagpur ATS Crackdown: नागपुरात ATSनं मोठी कारवाई केलीय... खेळाच्या मैदानातून देशविरोधी कारवायांकडे तरुणांना वळवण्याचा आणि ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न नेमकं कोण करतंय... नागपुरात दहशतवादाचा क्लब नेमकं कोण चालवतयं...

Suprim Maskar

दहशतवाद हा फक्त सीमेपुरता मर्यादीत राहिला नाहीय... तर तो तुमच्या घरापर्यंत पोहचलाय.... होय..उच्च शिक्षित तरुणांचं ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी बनवण्याचा कट ATS नं उधळून लावलाय... यवतमाळच्या पुसद, उमरखेडपासून ते अहिल्यानगरपर्यंत एटीएसने तब्बल 27 ठिकाणी छापे टाकले... याचं गुप्त छाप्यांमध्ये दहशतवाद्याच्या नव्या मॉडेलची माहिती मिळालीय.

राज्यात नवी दहशतवादी संघटना उभी करण्याचा कट

फुटबॉल क्लबच्या माध्यमातून तरुणांना एकत्र करण्याचा प्रयत्न

मुस्लीम तरुणांना खेळाडू म्हणून महाराष्ट्राबाहेर पाठवल्याची माहिती

प्रशिक्षणाच्या नावाखाली राज्याबाहेर ट्रेनिंग आणि कॅम्पसाठी पाठवल्याचा संशय

इंजिनिअर्स, पदवीधर अशा उच्चशिक्षित तरुणांचे यासाठी ब्रेनवॉश

दरम्यान या प्रकरणातील संशयित मूळचा पुसदचा असला तरी तो काही काळाकरता नागपूरमध्ये राहून काम करत होता अशी सुत्रांची माहिती आहे....तपास यंत्रणा त्याच्या आर्थिक व्यवहार आणि डिजिटल कम्युनिकेशनची सखोल चौकशी करत आहेत. मुळात खेळाच्या मैदाना आडून जर तरुणांना देशविरोधी धडे देऊन कटकारस्थान केलं जातं होत... तर ते वेळेत उघड करणं ही सुरक्षा यंत्रणांसाठी मोठी कसोटी होती.

व्हॅलेंटाईन डे’ला एटीएसनं केलेल्या या कारवाईतून पुढील काळात काय नवीन खुलासे होणार? ग्रामीण भागातील उच्चशिक्षित तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना देशविरोधी कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न करणारा मास्टरमाईंड कोण आहे? या दहशतावादी नेटवर्कला आर्थिक पुरवठा नेमका कुठून होत होता, याचा तपास आता सुरक्षा यंत्रणांच्या केंद्रस्थानी असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT