Water Tank Cleaning Hacks Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News : कुतूहलापोटी टाकीत डोकावली, तेव्हाच आक्रित घडलं; चार वर्षीय चिमुकलीचा बुडून मृत्यू

Nagpur News : शमशाद खान हे आपल्या कुटुंबासह अंतुजी नगरमध्ये राहतात. ते खाजगी वाहन चालक म्हणून काम करतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन लहान मुली आहेत. सोमवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

Prashant Patil

नागपूर : नागपूरमध्ये एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडेवाडी परिसरात असलेल्या अंतुजी नगरमध्ये सोमवारी एक घटना घडली. छतावर खेळत असताना चार वर्षांची अनम शमशाद खान या चिमुरडीचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शमशाद खान हे आपल्या कुटुंबासह अंतुजी नगरमध्ये राहतात. ते खासगी वाहनचालक म्हणून काम करतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन लहान मुली आहेत. सोमवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास ही घटना घडली. मृत अनम ही घराच्या छतावर खेळत होती. छतावरच एक पाण्याची टाकी असून, त्यावर झाकण नसल्याने ती टाकी उघडीच होती.

खेळता-खेळता अनम टाकीजवळ गेली आणि कुतूहलापोटी ती टाकीत डोकावण्याचा प्रयत्न करत असताना तिचा तोल गेला आणि ती थेट पाण्यात बुडाली. ही घटना घडल्याची कोणालाच कल्पना नव्हती. सुमारे दोन तासांनी अनम कुठे दिसत नसल्याने तिच्या शोध घेण्यासाठी घरातील सदस्य आणि शेजाऱ्यांनी परिसर पिंजून काढला. अखेर छतावरील पाण्याच्या टाकीत पाहिल्यावर तिचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. तात्काळ तिला टाकीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे खान कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकही हादरून गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT