voting counting begins Nagar Panchayat Election 2022 Result saam tv
महाराष्ट्र

Nagar Panchayat Election 2022 Result: गुलाल आमचाच; राज्यातील नेत्यांची प्रतिष्ठापणास

राज्यातील विविध जिल्ह्यात मंगळवारी नगरपंचायत, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी मतदान झाले हाेते.

Siddharth Latkar

सातारा : ओबीसी आरक्षणावर (obc reservation) खूला प्रवर्ग ग्राह्य धरुन राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मंगळवारी नगरपंचयात, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या राखीव जागांसाठी निवडणुक झाली. या निवडणुकीसाठी उमेदवारांनी जय्यत तयारी केली हाेती. मंगळवारी नगरपंचायतीसाठी (nagar panchayat election 2022) मतदारांनी उत्साहात मतदान केले हाेते. काही जिल्ह्यात मतदानावेळीस गाेंधळ उडाला परंतु पाेलिसांनी तातडीने लक्ष घालून तेथील वातावरण शांत केले. आज (बुधवार) सकाळी दहापासून राज्यातील त्या त्या जिल्ह्यांमध्ये मतमाेजणीस (Nagar Panchayat Election 2022 Result) प्रारंभ हाेणार आहे.

काेणाला किती मते (vote) मिळाली, काेणाचे पारडे जड राहिले याची माहिती दहानंतर समजणारच आहे. राज्यातील महत्वाच्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणास लागल्याचे बाेलले जात आहे. काही जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदाच निवडणुक हाेत असल्याने तेथे नागरिकांना काेण निवडून येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

बहुतांश जिल्ह्यात मतमाेजणीची तयारी पुर्ण झाली आहे. वार्ड निहाय फे-या जाहीर केल्या जाणार आहेत. उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना मतमाेजणी ठिकाणी साेडण्यात येणार आहे. राज्यात जमावबंदीचे आदेश असल्याने त्याचे पालन करावे असे आवाहन विविध जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांनी मंगळवारीच केल्याने उमेदवारांच्या विजयी मिरवणुका निघणार नाहीत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT