sangamner morcha, hindu organization morcha saam tv
महाराष्ट्र

Sangamner Morcha News: संगमनेरला हिंदु जन आक्राेश माेर्चा; 'समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही समर्थ' (पाहा व्हिडिओ)

Hindu Jan Akrosh Morcha: यावेळी विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेड

Sangamner Morcha News : छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, हिंदु धर्म की जय अशा घाेषणा देत आज (मंगळवार) नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे हिंदुत्ववादी संघटनांनी (hindu organizations) हिंदु जन आक्रोश मोर्चा काढला आहे. भगव्या टाेप्या, भगवे कपडे परिधान केलेले हजाराे नागरिक या माेर्चात सहभागी झालेत. दरम्यान या निमित्त संगनेर शहरात आज कडकडीत बंद देखील पाळण्यात आला आहे. (Maharashtra News)

हिंदु समाजावर होणारे हल्ले, वाढती गुन्हेगारी आणि लव्ह जिहाद या प्रवृत्तीच्या विरोधात हा भगवा मोर्चा काढण्यात आला. या माेर्चात सहभागी हाेण्यासाठी संगमनेर तालुक्यातील अनेक गावांत आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या माेर्चात महिला आणि युवती देखील माेठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

दरम्यान गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा प्रदीर्घ काळासाठी पाठीशी घातले जातात तेव्हा ते नियंत्रणाबाहेर जातात. संगमनेर शहरात जो जनआक्रोश झालाय तो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई न होणे, पोलीस प्रशासनावर दबाव टाकणे या प्रवृत्ती विराेधात असल्याचे मत खासदार सुजय विखे पाटील (mp sujay vikhe-patil) यांनी नमूद केले.

ते म्हणाले महाविकास आघाडीच्या कालावधीत पोलिसांवर दबाव टाकला गेला. हॉर्न मारला या छोट्या गोष्टीवरून वाद करणे चुकीचे आहे. कुणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय छोट्या गोष्टीहून मोठ्या प्रकारचे वाद होत नाहीत असेही खासदार सुजय विखेंनी नमूद केले. विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांवर (mla balasaheb thorat) अप्रत्यक्ष निशाणा साधला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT