shevgaon, nagar news, shevgaon bandh
shevgaon, nagar news, shevgaon bandh saam tv
महाराष्ट्र

Shevgaon Bandh News : शेवगावात एलसीबीची कारवाई, तिघे अटकेत; चाैथ्या दिवशीही गावात कडकडीत बंद

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Shevgaon News : शेवगाव शहरातील वादग्रस्त घटनेनंतर सलग चाैथ्या दिवशी (बुधवार, ता. 17 मे) गावातील व्यावसायिकांनी त्यांची दुकानं तसेच ग्रामस्थांनी गाव बंद (shevgaon Bandh) ठेवले आहे. दरम्यान शेवगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामस्थांनी देखील गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra News)

शेवगाव शहरातील वादग्रस्त घटनेनंतर पाेलिसांनी 31 जणांना ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान या घटनेनंतर जाेपर्यंत ढासळलेली कायदा व सुव्यवस्था सुरळीत हाेत नाही ताेपर्यंत गावातील व्यापारी संघटनांनी आणि ग्रामस्थांनी गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार आजही गावातील दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान या घटनेप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (lcb) तीन संशयितांना अटक केली आहे. शेवगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी तालुक्यातील करंजी गाव बंद ठेवण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : शैक्षणिक वर्ष आटोपले तरीही शिष्यवृत्ती अर्जाचा तिढा कायम; १० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित

Buldhana DJ Banned News : बुलढाणा जिल्ह्यात DJ वाजवण्यास बंदी, 22 डीजेवर पोलिसांकडून कारवाई

वर्ल्डकप संघात स्थान मिळताच स्टार खेळाडूची सुपरफ्लॉप कामगिरी!ठरला राजस्थानच्या पराभवाचं कारण

Vastu Tips: कामाच्या टेबलवर ठेवू नका या वस्तू, नकारात्मकता वाढेल

Today's Marathi News Live : PM मोदींप्रमाणे एकही सुट्टी न घेता काम करतोय - CM एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT