Onion farmers in Nashik struggle as NAFED procurement stalls due to lack of market trade license for appointed agencies. Saam tv
महाराष्ट्र

'नाफेड'कडून कांदा खरेदी नाहीच, कांदा खरेदीची घोषणा कागदावरच

Farmers In Trouble As NAFED Procurement Faces Technical Hurdle: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाफेडकडून कांदा खरेदी होणार असल्याची घोषणा केली... मात्र नाफेडनं नियुक्त केलेल्या सहकारी संस्थांना बाजार समितीचा व्यापार परवाना नसल्यानं शेतकऱ्यांची मोठी अडचण झालीय... त्यामुळे कांदा खरेदी कशी अडचणीत आलीय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

नाफेडची कांदा खरेदी आणि वाद... हे आता एक समीकरणच बनलंय... गेल्या वर्षी आर्थिक गैरव्यवहारामुळे वादात सापडलेली नाफेडची कांदा खरेदी यावेळी देखील अगदी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. शेतकऱ्यांच्या वाढत्या रोषानंतर नाफेड थेट बाजार समितीतून कांद्याची खरेदी करेस , असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते . मात्र या बाजार समितीचा कांद्याची विक्री करण्यासाठी ज्या सहकारी संस्थांची नियुक्ती करण्यात आली... त्याच्याकडे व्यापारी परवाना नसल्यानं कांदा खरेदीत नवा पेच निर्माण झालाय....

बाजार समितीतील लिलावात सहभागी होऊन कांदा खरेदी करण्यासाठी बाजार समितीचा व्यापारी परवाना आवश्यक असतो. मात्र नाफेडकडून कांदा खरेदीसाठी ज्या सहकारी संस्थांना नियुक्त करण्यात आलंय, त्यांच्याकडे बाजारसमितीचा व्यापारी परवाना नाही... त्य़ामुळे व्यापारी परवाना नसल्यानं या सहकारी संस्थांना थेट बाजारसमितीतून कांदा खरेदी करता येऊ शकत नाही...या नव्या तांत्रिक पेचामुळे नाफेडला थेट बाजारातून कांदा खरेदीसाठी तांत्रिक अडचण निर्माण झालीय...

गेल्यावर्षीपर्यंत नाफेड अँग्रो कंपन्यांना टेंडर प्रक्रियेतून नियुक्त करून व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करत होतं... मात्र यावेळी बाजार समितीत येऊन थेट शेतकऱ्यांकडून लिलावाद्वारे कांद्याची खरेदी केली जाणार होती... ज्यामुळे लिलावात चांगला दर शेतकऱ्यांना मिळणं शक्य होतं... मात्र बाजारातून थेट कांदा खरेदी करण्यासाठी बाजार समितीचा व्यापारी परवाना नसल्यानं शेतकऱ्यांकडून कांदा खरेदीची घोषणा आता कागदावरच राहणार का? शेतकऱ्यांना कांद्याचा चांगला दर मिळवण्यासाठी पुन्हा व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावं लागणार, हे नक्की...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mosquitoes : डासांना पळवून लावण्यासाठी लिबांच्या सालीचा भन्नाट उपाय, एकदा नक्की करून पाहा

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Housing Society : घरमालकांसाठी महत्त्वाचा नियम! फ्लॅट भाड्यानं देताना केली १ चूक, पुण्यात १३० जण अडचणीत; कायदा काय सांगतो? वाचा

Chanakya Niti : नातेवाईकांना 'या' 7 गोष्टी सांगाल तर रस्त्यावर याल! चाणक्यांचा गंभीर इशारा

कल्याणमध्ये १८४ रहिवाशांची १७६ कोटींची फसवणूक? बड्या बिल्डरविरोधात खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT