MSRTC Bus Saam tv
महाराष्ट्र

मागचे एक चाक नसूनही बस धावली; ३० प्रवाशांचा जीव धोक्यात

मागचे एक चाक नसूनही बस धावली; ३० प्रवाशांचा जीव धोक्यात

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले (Akole) आगारातून कसारा येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसच्या (St Bus) मागील भागात चार पैकी एक चाक नसूनही बस धावली. विशेष म्हणजे 30 पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन लोकांचा जीव धोक्यात घालण्याची लीला या बसने केली आहे. (Breaking Marathi News)

इगतपुरीजवळ (Igatpuri) महामार्गावरून ही बस धावत असतांना अन्य एका वाहन धारकाने बस चालकाला सांगितल्याने ही घटना उघडकीस आली. यानंतर ही बस कंपनीजवळ थांबवण्यात आली आहे. एसटी बस (क्र. MH 15 BT 4129) असून अनेक प्रवाशांचा (Nashik) जीव धोक्यात घालणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी उपस्थित प्रवाशाने केली आहे.

घाट रस्‍त्‍यातून धावली बस

अकोलेहुन कसारापर्यंत अनेक वळणदार रस्ते, घाट असल्याने अशा बेजबाबदार कारभारामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकली असती. सुदैवाने ही घटना उघडकीस आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. एसटीबद्धल अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर आजची घटना महत्वाची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT