dhananjay munde | धनंजय मुंडे  SaamTvNews
महाराष्ट्र

माझा ड्रायव्हर सुद्धा मला हॉस्पिटलमध्ये सोडायला आला नाही; मुंडेंनी व्यक्त केली खंत!

मला पहिल्यांदा कोरोना झाला, तेव्हा मी मित्राच्या फ्लॅटवर राहत असताना, ड्रायव्हरला बोलवलं, आणि त्याला हॉस्पिटला जायचं आहे म्हणालो. मात्र, त्यांनी हॉस्पिटलमध्ये सोबत यायला नकार दिला.

विनोद जिरे

बीड : पहिल्या लाटेत माणुसकी हरवत गेली. यादरम्यान मला पहिल्यांदा कोरोना झाला, तेव्हा मी याचा अनुभव घेतला आहे. मी मित्राच्या फ्लॅटवर राहत असताना, ड्रायव्हरला बोलवलं, आणि त्याला हॉस्पिटला जायचं आहे म्हणालो, मात्र त्यांनी हॉस्पिटलमध्ये (Hospital) सोबत यायला नकार दिला. या काळात भाऊ भावाला जवळ येऊ देत नव्हता, पहिल्या लाटेत माणुसकी हरवत गेली. तीच माणुसकी पुन्हा लाटेत जिवंत झाली. असा अनुभव सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवला.

हे देखील पहा :

बीड (beed) जिल्हा रुग्णालयातील विषाणू संशोधन व विषाणू निदान प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रसंगी मुंडे बोलत होते. कोरोनाच्या (Corona) पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये, आरोग्य कर्मचारी, महसूल जिल्हा परिषद कर्मचारी, यांनी केलेल्या कामामुळे हजारो लोकांना जीवनदान मिळाले. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करत, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. कितीही मोठे संकट आले, तरी यंत्रणा अपुरी पडणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संजय दौंड यांच्यासह जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा, पोलिस अधीक्षक आर. राजा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांची उपस्थिती होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

SCROLL FOR NEXT