congress Saam Tv
महाराष्ट्र

महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब

Thackeray Brothers Alliance: ठाकरे बंधूंच्या युतीवरून महाविकास आघाडीत बिघाडी झालीय... काँग्रेसनं महापालिका निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याचं मनाशी पक्क केलयं... मात्र काँग्रेसला मनसेसोबत युती का नको? काँग्रेसला खासदार राऊतांनी साद का घातलीय?

Bharat Mohalkar

राज्यात 29 महापालिका निवडणुकांची घोषणा झालीय... त्यामुळे राजकीय भेटीगाठी,युती-आघाडी, जागावाटप आणि पक्षांतरच्या घटनांना वेग आलाय...अशातच पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला उधाण आलयं... मात्र ठाकरे बंधूंच्या युतीनंतर काँग्रेस नेमकं काय भूमिका घेणार, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय... त्यातच ठाकरेसेनेनं आमच्या युतीत काँग्रेस नसल्याचे स्पष्ट संकेत दिलेत... त्यामुळे काँग्रेस मविआतून बाहेर पडणार का? असाही सवाल निर्माण झालाय....

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आधीच महाविकास आघाडीत नव्या भिडूची गरज नाही, असं विधान करून राज ठाकरेंना युतीत समावून घेण्यासाठी विरोध केला होता...काँग्रेसला राज ठाकरे नेमके का नकोत?

राज ठाकरेंची आक्रमक हिंदुत्ववादी आणि मराठी भाषेच्या भूमिकेमुळे काँग्रेसपुढे पेच निर्माण झालाय... मराठीच्या मुद्द्यावरुन मारहाणीमुळे उत्तर भारतीय मतं दुरावण्याची काँग्रेसला भीती आहे... भोंग्याविरोधातील भूमिकेमुळे अल्पसंख्याक मतं दुरावण्याची शक्यता काँग्रेसला सतावतेय...

खरंतर महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुक एकत्र लढवली होती.. त्यावेळी मुंबईतील 6 पैकी 4 तर राज्यात 30 जागांवर मविआचा विजय झाला होता..... मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून झालेल्या रस्सीखेचात मविआचा राज्यात सुफडा साफ झाला... अशातच महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानं विरोधकांच्या फुटीचा सत्ताधारी पक्षांना फायदा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT