hijab ban uphold by karnatak high court. saam tv
महाराष्ट्र

Hijab Ban: हे याेग्यच : मुस्लिम सत्यशोधक मंडळ; सर्वाेच्च न्यायालयात जाणार : धर्मगुरू

या निर्णयावर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- विश्वभुषण लिमये, तबरेज शेख

पुणे : शैक्षणिक संस्थांमधील हिजाब (hijab) बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक (Karnatak) उच्च न्यायालयाने (High Court) आज दिला आहे. हिजाब हा मुस्लिम (muslim) धर्माचा अविभाज्य भाग नसल्याने शाळा आणि महाविद्यालयात करण्यात आलेली हिजाब बंदी योग्यच असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. या निर्णयावर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. (hijab ban latest marathi news)

कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय याेग्य असल्याचे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमशोद्दीन तांबोळी यांनी नमूद केले. या निर्णयाचे आपण आदर केला पाहिजे असेही प्रा. तांबाेळी यांनी नमूद केले.

हिजाब बंदीला विरोध करणाऱ्या याचिकांवर न्यायालयाने हा निर्णय दिला असून त्यावर मुस्लिम धर्मगुरूंनी आक्षेप घेतला आहे. नाशिकचे वसीम पिरजादे म्हणाले या निर्णया विरोधात सर्वाेच्च न्यायालयात दाद मागणार आहाेत. बुरखा आणि हिजाब या वेगळा विषय असून या बाबत मुस्लिम धर्मियांच्या कुरणात भाग नंबर १८ आणि २२ मध्ये हिजाब बाबत महिलांनी घराबाहेर पडताना डोक्यावर पदर घ्यावा याबाबत नोंदी असल्याचं धर्मगुरूंनी म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील रवाना

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

SCROLL FOR NEXT