तरुणाची ऊसाच्या शेतात नेऊन हत्या ! लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

तरुणाची ऊसाच्या शेतात नेऊन हत्या !

अपहरण करून 15 वर्षीय तरुणाची उसाच्या शेतात नेऊन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव शिवारात घडली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : अपहरण करून 15 वर्षीय तरुणाची उसाच्या शेतात नेऊन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव शिवारात घडली आहे. जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या हत्येच्या तिसऱ्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घनसावंगी तालुक्यातल्या देवी दहेगाव गावातली पंधरा वर्षीय अनिकेत भाऊसाहेब घुगे हा तरुण गेल्या आठ दिवसांपूर्वी रात्री दहाच्या सुमारास अचानक गायब झाला होता.

हे देखील पहा -

सर्वत्र शोध घेऊन ही अनिकेत चा कुठंच शोध लागत नसल्याने दुसऱ्या दिवशी भाऊसाहेब घुगे यांच्या तक्रार घनसावंगी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दुसऱ्या दिवशी दाखल करण्यात आला होता. गेल्या आठ दिवसापासून घनसावंगी पोलीस अनिकेत आणि त्यांच्या अपहरण अपहरणकर्त्यांचा शोध घेत होते, मात्र काहीच धागेदोरे हाती लागत नव्हते. या प्रकरणी गावातील काही संशयितांची कसून चौकशी ही करण्यात आली होती.

दरम्यान यातील संशयित व्यक्ती एक ऑगस्ट च्या रात्री गावाबाहेरून येताना काही ग्रामस्थांनी पाहिला असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी त्या संशयितांची कसून चौकशी केली. या चौकशीत त्याने एका साथीदारासह खून केल्याची कबुली दिली आहे. आपणच देवीदहेगाव शिवारातील गोरखनाथ काळे यांच्या उसाच्या शेतात नेऊन अनिकेत घुगे याच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची कबुली महादेव नामदेव शिंदे आणि आकाश भागवत शिंदे यांनी दिली.

पोलिसांनी या आरोपींना तात्काळ अटक करून घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे. अनिकेतची हत्या आठ दिवसांपूर्वी करण्यात आली असल्याने मृतदेह पूर्णपणे कुजला होता. त्यामुळे घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून आज सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी आरोपी महादेव नामदेव शिंदे वय 19 वर्ष आणि आकाश भागवत शिंदे वय वर्ष 19 यांच्या विरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटी कायद्यासह अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर, तर शिदेंचा वरळी डोममध्ये?

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात श्राद्धाला कावळा शिवला नाही तर काय करावे?

Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Recharge Plan Offer: भारीच! आपल्या प्रियजनांशी मनमुराद बोला! 'या' टेलिकॉम कंपनीची भन्नाट ऑफर

SCROLL FOR NEXT