लग्नास नकार दिल्याने हाताची नस कापून केली प्रेयसीची हत्या! अभिजीत घोरमारे  अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

लग्नास नकार दिल्याने हाताची नस कापून केली प्रेयसीची हत्या!

चार-पाच वर्षापासून प्रेम असल्यामुळे व शिल्पाच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने नयनने तिचा खून करण्याचा कट रचला. विशेष म्हणजे नयनने आज सकाळीच नवीन चाकू विकत घेतला होता.

अभिजीत घोरमारे

भंडारा : लग्नाची मागणी घालण्यासाठी गेलेल्या तरुणाला तरुणीच्या घरच्यांनी नकार दिल्याने प्रेयसीच्या हाताची चाकूने नस कापून खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा तरुणावर खूनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. शिल्पा तेजराम फुल्लुके (वय 19) वर्ष रा. मऱ्हेगाव ता. लाखनी असे मृत तरुणीचे नाव आहे. तर, नयन विश्वनाथ शहारे (वय 19) रा. पालांदूर असे आरोपीचे नाव आहे.

हे देखील पहा :

शिल्पा ही पालांदूर येथील संताजी कला व वाणिज्य महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होती. सोमवारी तिला पाहण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील पाहुणे येणार होते. त्यानिमित्ताने ती खरेदी करण्यासाठी घरून सकाळी 11 वाजता निघाली. त्यानंतर दुपारी 3 वाजताच्या सुमारास तिचा पालांदूर-अड्याळ रस्त्यावरील स्माशभूमीजवळ मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ चाकू आणि विषाची बाटलीही सापडली. त्यामुळे या घटनेचे गूढ वाढले आहे. पालांदूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असता शिल्पाच्या डाव्या हाताची नस कापल्याने रक्तस्त्राव होवून तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

चाकूचा वार खोलवर झाल्याने व नस कापली गेल्याने तिने स्वत: नस कापली नसावी, असा पोलिसांना संशय आला. त्यादृष्टीने तपास केला असता तिचे पालांदूर येथील एका तरुणाशी प्रेम प्रकरण असल्याचे पुढे आले. तसेच आठ दिवसापुर्वी तो शिल्पाच्या घरी लग्नाची मागणी करण्यासाठी गेला होता. परंतु त्याला नकार दिल्याने त्याने हा खून केल्याचा पोलिसांना संशय आला असता दरम्यान आरोपी नयन शहारे याला ताब्यात घेतले। चौकशीअंती रात्री उशिरा खूनाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.

चार-पाच वर्षापासून प्रेम असल्यामुळे व शिल्पाच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने नयनने तिचा खून करण्याचा कट रचला. विशेष म्हणजे नयनने आज सकाळीच नवीन चाकू विकत घेतला होता. याच चाकूने शिल्पाच्या हाताची नस कापून तिचा खून केला. एवढेच नाही तर त्याने खून कसा करावा याबाबत व्हिडीओ बघितल्याचीही माहिती पुढे आली आहे. या घटनेचा तपास पालांदूर पोलिस करीत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji Recipe : मुंबई स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची? सीक्रेट रेसिपी आताच लिहून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड घाटात वाहतूक कोंडी

शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

लाडक्या बायकोसाठी चांदीच्या जोडव्याचे 5 सुंदर डिझाईन्स

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT