धुळे तालुक्यातील जापी परिसरात तरुणाचा खून Saam Tv
महाराष्ट्र

धुळे तालुक्यातील जापी परिसरात तरुणाचा खून

याबाबतची माहिती तालुका पोलिसांना समजताच तालुका पोलिसांची संपूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे - तालुक्यातील जापी शेत शिवारातील शेतात खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र रामसिंग बारेला पावरा तरुणाचा धारदार शस्त्राने गळ्यावर त्याचबरोबर शरीराच्या इतर ठिकाणी सपासप वार करून निर्घुणपणे या युवकाची हत्या करण्यात आली आहे. याबाबतची माहिती तालुका पोलिसांना समजताच तालुका पोलिसांची संपूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली.

हे देखील पहा -

शेतामध्ये तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अवस्थेमध्ये पोलिसांना आढळून आला. यासंदर्भात प्राथमिक माहितीवरून तालुका पोलिसांनी संशयितांना देखील ताब्यात घेतले आहे. या खुनाचा उलगडा लवकरच लागण्याची शक्यता तालुका पोलिसांनी व्यक्त केली आहे. फॉरेन्सिक एक्सपर्टच्या मदतीने तालुका पोलिसांतर्फे पुढील तपास सुरु करण्यात आला असून संपूर्ण परिसरामध्ये या हत्येची बातमी पसरताच एकच खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kshipra Joshi: स्पृहा जोशीची बहीण काय करते? गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे नोंद

Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा झटका, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

The Trial 2: मी किती वेळा कमबॅक करू? 'द ट्रायल 2' ची घोषणा करताना का चिडली काजोल?

Pimpri Chinchwad Police : ५७ गुन्हेगारांवर एकाचवेळी मोका अंतर्गत कारवाई; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेमध्ये मनसेला महाविकास आघाडीची साथ

SCROLL FOR NEXT