Murbad news  Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Murbad News : सध्या सतत कुठे ना कुठे महामंडळाच्या बसचा अपघात होत आहे. सुरक्षित प्रवास असे ब्रीद असलेल्या महामंडळच्या बसमध्ये असुरक्षित प्रवास अशीच ओळख निर्माण झाली

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
मुरबाड
: वाल्लीवरे- मुरबाड बस प्रवाशी घेऊन मार्गस्थ झाल्यानंतर घाट रस्त्यात बसचा अपघात झाला. या अपघातात ३० ते ४० जण जखमी असून या जखमींमध्ये शाळेतील विद्यार्थ्याचा देखील समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सध्या सतत कुठे ना कुठे महामंडळाच्या बसचा अपघात होत आहे. सुरक्षित प्रवास असे ब्रीद असलेल्या महामंडळच्या बसमध्ये (St Bus) असुरक्षित प्रवास अशीच ओळख निर्माण झाली आहे. बसमध्ये प्रवाशांबरोबर शाळेतील विद्यार्थ्यी देखील प्रवास करतात. कधी ब्रेक फेल होणे, तर कधी अर्ध्या वाटेतच बस बंद पडणे; अशी परिस्थिती महामंडळच्या बसची झाली आहे. कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्याने नाईलाजाने बसमधून प्रवास करावा लागतो. मात्र बसच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून रोज कुठे ना कुठे (Bus Accident) बस अपघात होत आहेत.

दरम्यान आज सकाळी मुरबाड तालुक्यातील वाल्लीवरे - मुरबाड बस ही माळशेज घाट मार्गे मुरबाडकडे येत असताना मुरबाड माळशेज मार्गावर वैशाघरे जवळ बसचा अपघात झाला. यात ४० ते ५० प्रवासी होते. यामध्ये शाळेतील विद्यार्थी देखील प्रवास करत होते. या सर्व जखमींना टोकवडा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT