Barvi Dam Saam tv
महाराष्ट्र

Barvi Dam : बारवी धारण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा; ठाण्यात करणार धरणे आंदोलन

Murbad News: कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी बारवी धरणाची निर्मिती करण्यात आली

Rajesh Sonwane

फय्याज शेख 
मुरबाड
: बारवी धरण प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मुरबाड ते ठाणे मोर्चा निघाला आहे. प्रकल्पग्रस्त (Farmer) शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा मोर्चा वरीष्ठ पोलिस परिमंडळ अधिकारी कार्यालय ठाणे (Thane) येथे धरणा देणार आहेत. (Latest Marathi News)

कल्याण (Kalyan), डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ (Ambarnath) आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी बारवी धरणाची निर्मिती करण्यात आली. यानंतर पाणीपुरवठा कमी होऊ नये; म्हणून पुन्हा बारवी धरणाच्या (Barvi Dam) तिसरा टप्प्यात उंची वाढवण्यात आली. तिसरा टप्पा वाढवताना भूसंपादन केलेल्या जमिनी व्यतिरिक्त आणखीन सहा गाव व पाड्यांसह शेत जमिनीवर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुडाल्या. यानंतर अनेक आंदोलन झाली. काही गावपाड्यांच्या लोकांचे पुनर्वसन झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र बारावी धरणाची उंची वाढविल्यानंतर जी शेत जमीन भूसंपादीत झाली नाही. अशा मुरबाड तालुक्यातील काचकोली, तोंडली, कोले मोहगर, मानिवली अशी सहा गावे आणि पाच पाड्यांचा अद्यापही या प्रकल्पग्रस्तांचा विषय प्रलंबितच राहिला आहे. यामुळे आज ह्या गावपाड्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुरबाड ते ठाणे असा मोर्चा काढला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ममता बॅनर्जी थेट सुप्रीम कोर्टात वकीलाच्या भूमिकेत, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, न्यायालयात काय घडलं? VIDEO

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

मोठी बातमी! भाजपने आपले 66 नगरसेवक अज्ञातस्थळी हलवले|VIDEO

राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की लांबणार? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर नवा ट्विस्ट, VIDEO

काँग्रेसमध्ये गटबाजी, भाजप सत्ता खेचणार?

SCROLL FOR NEXT