Murbad Crime Saam tv
महाराष्ट्र

Murbad Crime : हॉटेलमध्ये येत पैशांची मागणी; नकार दिल्याने हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला

Shahapur : १७ तारखेला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास काही हल्लेखोरांनी हाॅटेलमध्ये येऊन पैशांची मागणी केली. मात्र महेंद्र हरड यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे हल्लेखोरानी लाकडी दांडक्याने मारहाण

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
मुरबाड
: हॉटेलमध्ये रात्रीच्या सुमारास काही जणांनी प्रवेश करत हाॅटेल मालकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मुरबाड तालुक्यात घडली आहे. दरम्यान हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाली असून पैश्याच्या मागणीसाठी हल्ला केल्याचे हाॅटेल मालकाचा आरोप असून या प्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कायद्याचा धाक राहीलेला आहे किंवा नाही असीच चर्चा सुरू झाली आहे. 

मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे महेंद्र राजाराम हरड (वय ४२) यांच्या मालकीचे साई दरबार बार आणि रेस्टॉरंट असून हे हाॅटेल चालवण्याचा व्यवसाय करतात. दरम्यान १७ तारखेला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास काही हल्लेखोरांनी हाॅटेलमध्ये येऊन पैशांची मागणी केली. मात्र महेंद्र हरड यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे हल्लेखोरानी कपड्यामध्ये लपवून आणलेल्या लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. 

हॉटेलमधील कामगारांनी हल्लेखोरांना रोखले 

मालकाला मारहाण होत असल्याचे पाहून हाॅटेलमध्ये असलेल्या नोकरांनी हल्लेखोरांची समजूत काढत बाहेर काढले. यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. यात हॉटेल मालक महेंद्र हरड हे जखमी झाले आहेत. दरम्यान हॉटेलमध्ये घडलेली सर्व मारहाणीची घटना हाॅटेल मध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. 

तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

दरम्यान महेंद्र हरड यांनी लागलीच मुरबाड पोलिस ठाण्यात जावून चंदू बारकू हरड (रा.  शिदपाडा मुरबाड), मोहन कराळे (रा. शिदपाडा, मुरबाड), नितीन मलिक (रा.  पहे मुरबाड) यांच्या विरोधात मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून मुरबाड पोलिस या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र या सर्व घटनाक्रम पाहता मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांना कायद्याचा धक उरला आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT