Liqor Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad: महापालिकेतील क्लार्कने मागितली चक्क दारूची लाच

महापालिकेतील एका क्लार्कने लाच म्हणून चक्क विदेशी दारूची मागणी केली होती.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) महापालिकेतील एका क्लार्कने लाच म्हणून चक्क विदेशी दारू आणि पाच हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (Bribery Prevention Department) मिळाल्यानंतर त्या क्लार्कला उच्च प्रतीच्या दारुसोबत साडे तीन हजाराची लाच घेताना अटक केली आहे.

हे देखील पहा -

प्रभू लक्ष्मण चव्हाण असं त्या क्लार्कचं नाव असून तो औरंगाबाद महानगरपालिकेत ज्युनियर क्लार्क म्हणून काम करतो. औरंगाबाद महानगरपालिकेकडून (Aurangabad Municipal Corporation) मार्च एन्डमुळे शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात एका मालमत्ता धारकाचा मालमत्ता कर कमी करण्यासाठी विदेशी दारुसोबतच पाच हजाराची लाच मागितली. मालमत्ताधारकांनी याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवली. त्यानंतर सापळा रचून विदेशी दारू आणि साडेतीन हजार रुपये घेताना क्लार्कला रंगेहात पकडण्यात आलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT