22 years old young man died in railway accident saam tv
महाराष्ट्र

Thane : अग्निवीर होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं; लोकल ट्रेनच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

धुळ्याहून ठाण्यात आर्मी अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा लोकल (Local) ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कल्पेश गोरडे

Thane News : धुळ्याहून ठाण्यात (Thane) आर्मी अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा लोकल (Local) ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अग्निवीर भरतीसाठी ठाण्यात आलेल्या तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यामुळे त्याचं अग्निवीर होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. बुधवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुंब्रा स्थानकातील या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रामेश्वर देवरे असे रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. (Thane news In Marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील मुंब्रा एम. एम. व्हॅली परिसरातील मौलाना अब्दुल कलम आझाद स्टेडियम येथे आर्मी अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू आहे. सदर अग्निवीर भरती प्रक्रिया ही २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान सुरू असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी धुळ्याहून रामेश्वर भारत देवरे हा २२ वर्षीय तरुण आला होता.

या भरती प्रक्रियेसाठी आलेल्या तरुणाची अचानक तब्येत बिघडली. त्यावेळी रामेश्वर देवरे हा तरुण मुंब्रा स्थानकात बसला होता. रामेश्वरची तब्येत बिघडल्यामुळे त्याला ओकारी येत होती. ओकारी करण्यासाठी रामेश्वरने रेल्वे रुळाच्या दिशेने धाव घेतली. ओकारी करत असताना त्याचे आजूबाजूला लक्ष गेले नाही, त्यामुळे मागून आलेल्या रेल्वेने त्याला जोरदार धडक दिली.

रामेश्वरच्या अपघातानंतर मुंब्रा स्थानकात एकच खळबळ उडाली. रामेश्वरच्या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच ठाणे लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले.

रामेश्वरला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणाला मृत घोषित केले. मुंब्रा येथील फलाट क्रमांक ३ वर बुधवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. या अपघाताचे संपूर्ण थरारक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या घटनेने रामेश्वरच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT