Mumbai Vande Metro Local SAAM TV
महाराष्ट्र

Mumbai Vande Metro Local: मुंबईकरांचं वर्ल्ड क्लास रेल्वे प्रवासाचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार, 2026 पर्यंत धावणार 'वंदे मेट्रो लोकल'

Mumbai Local News Updates : मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने 'वंदे मेट्रो लोकल' बनवण्यासाठी 20 हजार कोटींहून अधिक किंमतीची आंतरराष्ट्रीय पातळीवर खुली स्पर्धात्मक निविदा काढली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Vande Metro Local Updates: मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांचं वर्ल्ड क्लास रेल्वे प्रवासाचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने या दिशेने पहिले पाऊल देखील उचलले आहे. एमआरव्हीसीने 'वंदे मेट्रो लोकल'साठी निविदा काढली आहे.

मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने 'वंदे मेट्रो लोकल' बनवण्यासाठी 20 हजार कोटींहून अधिक किंमतीची आंतरराष्ट्रीय पातळीवर खुली स्पर्धात्मक निविदा काढली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत ही निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे.

ही निविदा 2 हजार 856 वंदे मेट्रोचे डबे आणि त्यांच्या लाईफ टाईम देखभाल आणि दुरुस्ती यासाठी काढण्यात आली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचा मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनचा प्रयत्न आहे. यातील पहिली वंदे मेट्रो लोकल 2026 पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे, तर त्यानंतर दरवर्षी 50 वंदे मेट्रो लोकल दाखल होणार आहे. (Breaking News)

2030 पर्यंत सर्व 238 वंदे मेट्रो लोकल धावतील असे नियोजन एमआरव्हीसीने केले आहे. तसेच मेक इन इंडियाअंतर्गत वंदे मेट्रोची बांधणी होणार असून देखभाल आणि दुरुस्तीसाठी भिऊपुरी आणि वानगाव येथे अत्याधुनिक कारशेडची निर्मिती केली जाणार आहे. (Marathi Tajya Batmya)

सध्या मध्य रेल्वेकडे एकूण 150 लोकल आहेत तर पश्चिम रेल्वे लाईनवर एकूण 111 लोकल धावत आहेत.एमयुटीपी प्रकल्पांना राज्य सरकारने निधी देण्यास सुरुवात केल्यामुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 19 मे रोजी एमआरव्हीसीला 'वंदे मेट्रो लोकल' संदर्भात निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT