Hasan Mushrif Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांची मुंबई हायकोर्टात धाव; काय आहे कारण?

अंमलबजावणी संचालनालयाच्या खटल्यांमध्ये हेतू साधत कारवाई केली जात आहे, असा दावा मुश्रीफांनी केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Hasan Mushrif : ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.कोल्हापुरात दाखल करण्यात आलेला फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्याची त्यांनी मागणी केली आहे.अंमलबजावणी संचालनालयाच्या खटल्यांमध्ये हेतू साधत कारवाई केली जात आहे, असा दावा मुश्रीफांनी केला आहे. (Latest Maharashtra Politics News)

सुरू असलेल्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करू नये. यासह आरोपपत्रही दाखल करू नये याबाबत पोलिसांना निर्देश देण्याची मागणी देखील हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

कोल्हापुरातील मुरगूड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात २३ फ्रेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. विवेक कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतू राजकीय हेतुने प्रेरित होतं माझ्या विरोधात हे एक षडयंत्र आहे, असं मुश्रीफ म्हणालेत. त्यामुळेच त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

दाखल केलेल्या याचिकेद्वारे हसन मुश्रीफ यांनी पुढे म्हटलं आहे की, 'पहिले कंपनी कायद्याअंतर्गत पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये माझ्या मुलाला समन्स बजावण्यात आले. पुण्यात सुरू असलेल्या या कारवाईला पुढे उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे मला त्रास देण्याच्या हेतून कोल्हापूरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला मोठ्या आर्थिक गैरवैवहारात फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

कोल्हापूरात गुन्हा दाखल करण्याचं कारण काय?

विवेक कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, हसन मुश्रीफ यांनी बैठका घेत अनेक व्यक्तींकडून १० हजार रुपये घेतले होते. पैसे भरलेल्या सर्व नागरिकांना पत्येक महिन्यात ५ किलो साखर आणि विविध आर्थिक लाभ मिळतील असं मुश्रीफ यांनी आश्वासन दिलं होतं. साल २०१२ मध्ये हा सर्व प्रकार घडला. तेव्हापासून मुश्रीफांनी सांगितल्याप्रमाणे काहीचं केलं नाही. या प्रकरणात त्यांनी ४० कोटींची रक्कम घेतल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळेच हसन मुश्रीफांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas pain vs heart attack: सारखं छातीत दुखतंय....अॅसिडिटी की हार्ट अटॅकचं लक्षण? सोप्या भाषेत फरक समजून घ्या

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

Mumbai: गॅस सिलिंडरचा तुटवडा, भाजी मार्केटला फटका; ग्राहकांनी भाजी खरेदीकडे फिरवली पाठ

Nashik Tourism: नक्कीच माथेरान-महाबळेश्वर विसराल, नाशिकपासून ४५ किमी दूर आहे हे सुंदर हिल स्टेशन

Jio Recharge : जिओचा स्वस्त रिचार्ज प्लान, 336 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT