Maratha Aarakshan Mumbai Morcha Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Aarakshan Mumbai Morcha: आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाला अद्याप परवानगी नाही, पोलिसांची सावध भूमिका

Maratha Aarakshan Mumbai Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीला चलो मुंबईची हाक दिली आहे. मात्र मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाला मराठा आणि ओबीसी समाजाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maratha Aarakshan Mumbai Morcha

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीला चलो मुंबईची हाक दिली आहे. मात्र मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाला मराठा आणि ओबीसी समाजाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. 20 जानेवारीला आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाने पोलिसांशी पत्र व्यवहार केला होता. मात्र आंदोनाला काहीच तास शिल्लक असतानाही पोलिसांकडून कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. उद्यापासून सुरू होणारे आंदोलन 26 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानात पोहोचेल. त्यामुळे आझाद मैदान पोलिसांनी सावध भूमिका घेतली असून निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठा आक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २० जानेवारीपर्यंतची डेटलाईन दिली असून काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोज जरांगे पाटील २० जानेवारीला मुंबईत जाण्यावर ठाम आहेत.

७ हजार गावांमध्ये अद्यापही कुणबी नोंदी तपासायच्या राहिल्या आहेत. हा विषय गॅझेटमध्ये समोर आला आहे. त्यामुळे तुम्ही मध्यस्थी करून २० तारखेपर्यंत 54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी त्यांनी बच्चू कडूंकडे लावून धरली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण मिळणार असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईचा दिशेने येणारे आंदोलन स्थगित करावे अशी विनंती मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. त्याचबरोबर मुंबईत होणाऱ्या या आंदोलनादरम्यान जर अनवधानाने चार दोन माणसांमुळे परस्थिती हाताबाहेर जावू शकते. (Maratha Aarkshan) जर परिस्थिती हाताबाहेर गेली, तर ती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारला प्रयत्न करावा लागेल. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्याचे आंदोलन स्थगित करावे असं देखील देसाई म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT