Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

राज ठाकरे यांना मुंबई पोलीस अटक करु शकत नाहीत, यशवंत किल्लेदार म्हणाले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : औरंगाबादच्या मनसेच्या जाहीर सभेत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. या सर्व घडामोडीनंतर मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant killedar) यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, मुंबई पोलीस (Mumbai police) राज ठाकरे यांना अटक करु शकत नाहीत. संभाजी नगरमध्ये त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. त्यामुळे संभाजी नगरच्या पोलीसांनी मुंबई पोलीसांना याबाबत सूचना दिल्यानंतरच ते इथं येवू शकतात. राज ठाकरे यांना आज अटक होईल, असं मला वाटत नाही. अर्ध्यातासानंतर राज ठाकरे याप्रकरणी परिपत्रक काढणार आहेत.

मनसेच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची भोंग्याच्या मुद्द्यावर बैठकही झाल्याची सूत्रांची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 'शिवतीर्थ'बाहेर आल्या होत्या. त्यावेळी शर्मिला ठाकरे यांनी मनसैनिकांशी चर्चाही केल्याचं समजते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी (Mumbai police) मोठा फौजफाटा तैनात केला आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी शिवतीर्थवर मोठी गर्दी केलीय.

राज ठाकरे यांच्यासह सभेचे संयोजक राजू जवळेकर आणि मनसेचे इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक गजानान इंगळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कलम ११६, ११७, १५३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारित ३१ जुलै २०१७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचे पडसाद मुंबईत उमटू नयेत किंवा राज यांनी दिलेल्या अल्टीमेटममुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून राज ठाकरे यांनाही पोलीस १४९ अंतर्गत नोटीस बजावू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

SCROLL FOR NEXT