mumbai passenger reservation system to remain down for maintenance saam tv
महाराष्ट्र

Mumbai Passenger Reservation System: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी... प्रवासी आरक्षण प्रणाली राहणार बंद

प्रवाशांनी रेल्‍वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Central Railway News :

मुंबई पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम (Passenger Reservation System) रविवारी (ता. १४ जानेवारी) मध्यरात्री देखभालीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच १४ जानेवारीच्या रात्री ११.४५ वाजल्यापासून ते १५ जानेवारीच्या सकाळी ०५.१५ वाजेपर्यंत डिस्क डी-फ्रॅगमेंटेशनमधून जाईल. याचा परिणाम भारतीय रेल्वेवरील सर्व झोनवर हाेणार आहे. (Maharashtra News)

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनूसार यामुळे आईव्हिआरएस, चालू आरक्षण, रिफंड काउंटर आणि कोचिंग रिफंड टर्मिनल्सच्या सेवा उपलब्ध होणार नाहीत. तथापि, तिकिट ठेव पावती (टीडीआर) परताव्यासाठी विद्यमान परतावा नियमांनुसार प्रवाशांना जारी केली जाईल.

मुंबई पीआरएस गाड्यांसाठी आईआरसीटीसी (IRCTC) द्वारे इंटरनेट बुकिंग संबंधित कालावधीत उपलब्ध होणार नाही असे मध्य रेल्वेेने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी तसेच रेल्‍वे वापरकर्त्‍यांनी या महत्‍त्‍वाच्‍या देखभाल करण्‍याच्‍या कामासाठी सहकार्य करावे असे आवाहन रेल्‍वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT