Maharashtra News Live Update Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: भीमाशंकर मार्ग बंद; माळीण परिसरात दरड कोसळली

Marathi Breaking Live Headlines Updates : राज्यात पावसाचा हाहाकार सुरूच, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, पिंपरी-चिंचवड पावसाचा अलर्ट, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Pune: भीमाशंकर मार्ग बंद; माळीण परिसरात दरड कोसळली

उत्तर पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा कायम आहे.

आंबेगाव तालुक्यातील माळीण परिसरात मोठी दरड कोसळल्याने मंचर-भीमाशंकर मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

सतत पाऊस सुरू असल्याने आणखी दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळे भीमाशंकरकडे जाणाऱ्या पर्यटकांनी आणि नागरिकांनी या मार्गाने प्रवास टाळावा.

Pune: एकता नगरी एका सोसायटीत पाणी घुसले

पुणे

एकता नगरी एका सोसायटीत पाणी घुसले

शिवणे भागातही काही घरात पाणी घुसले

Ulhasnagar: मध्य रेल्वे अनिश्चित वेळाने चालत असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवासाची गर्दी

उल्हासनगर -

मध्य रेल्वे अनिश्चित वेळाने चालत असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवासाची गर्दी

रेल्वे स्थानकावरील इंडिकेटर बंद ठेवण्यात आले

तसेच आज उल्हासनगर ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस

पावसाळा सुरू झाल्यापासून प्रथमच ढगांचा कडकडाट विजयचा गडगडात शहरवासींना ऐकायला मिळतोय

आज अंबरनाथ उल्हासनगर शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

पहाटेपासून ढगाळ वातावरण आणि मुसळधार पावसाच्या सरी

Pune: खंडणी प्रकरणात बिश्नोई टोळीतील तिघांना राजस्थानमधून अटक

पुणे -

खंडणी प्रकरणात बिश्नोई टोळीतील तिघांना राजस्थानमधून अटक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची राजस्थान मध्ये जाऊन कारवाई

तीन जणांकडून तीन गावठी पिस्तूल आणि ३० जिवंत काडतुसे जप्त

फुरसुंगी परिसरातील एका व्यावसायिकाकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांच्या कंपनीच्या प्रवेशद्वारावर गोळीबार करण्यात आला होता

Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्याला आजही यलो अलर्ट, 2 दिवसांपासून पावसाची संततधार

अहिल्यानगर -

अहिल्यानगर जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

जिह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

दोन दिवसांपासून पावसाची संततधार

तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

भंडारदरा, मुळा आणि निळवंडे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ

भंडारदरा 50% , मुळा 40 तर निळवंडेत 26 टक्के पाणीसाठा

खरिप पेरणीला मिळणार मुहूर्त

गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या

Amravati: अमरावती जिल्ह्यात 75 टक्के पेरण्या पूर्ण

अमरावती जिल्ह्यात 75 टक्के पेरण्या पूर्ण

अमरावती मध्ये दोन दिवसात केवळ सात मिलिमीटर पावसाची नोंद

ऑरेंज अलर्टचा इशारा मात्र पाऊस बेपत्ता

Thane: ठाण्यात मागील १२ तासांत ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली

ठाण्यात मागील १२ तासांत ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली

पडणार्‍या पावसामुळे ठाण्यातील वंदना सिनेमा या ठिकाणी पाणी साचले

ठाण्यात मागील एक तासांत २० मिलिमीटर हून अधिक पावसाची नोंद झाली

आज देखील पावसाची संततधार सुरूच राहणार

Shahapur: आसनगाव - आटगाव दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड

शहापूर -

आसनगाव - आटगाव दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड

रेल्वे सेवा विस्कळित

कसाराकडे जाणारी वाहतूक ठप्प

Pune: चाकणमध्ये पावसाचा फटका, पुणे-नाशिक महामार्गासह औद्योगिक क्षेत्रात वाहतूक कोंडी

चाकणमध्ये पावसाचा फटका; पुणे-नाशिक महामार्गासह औद्योगिक क्षेत्रात वाहतूक कोंडी

मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून चाकण-तळेगाव मार्गासह संपूर्ण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

Pune: खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रात्रभर मुसळधार पाऊस

पुणे -

खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रात्रभर मुसळधार पाऊस

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 27303 क्युसेक पाण्याचा विसर्ग

नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट

प्रशासकीय यंत्रणा तैनात

पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर आज देखील पावसाचा अलर्ट

Kolhapur: कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फूट 5 इंचावर

कोल्हापूर -

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फूट 5 इंचावर

(पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट आहे तर धोका पातळी 43 फूट आहे)

60 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत

पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू

कोल्हापूरच्या पंचगंगेची वाटचाल संथ गतीने इशारा पातळीकडे सुरूच

कोल्हापुरात पावसाची उघडझाप तर पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम

राधानगरी, दूधगंगा धरणांसह जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये मुसळधार पाऊस

Nashik: सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस, नार नदीला पूर

नाशिक -

- सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस

- सुरगाणा तालुक्यातील उंबरदे जवळील नार नदीला पूर

Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज पुन्हा सकाळपासून पावसाची संततधार सुरू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज पुन्हा सकाळपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे.

हलकासा पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय.

कालही सकाळचा अर्धा दिवस असाच पाऊस झाला होता.

मात्र मोठा दमदार पाऊस होत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता कमी होत नाही.

या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना दिलासा मिळालाय.

Pune: खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रात्रभर मुसळधार पाऊस

पुणे -

खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रात्रभर मुसळधार पाऊस

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 27303 क्युसेक पाण्याचा विसर्ग

नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट

प्रशासकीय यंत्रणा तैनात

पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर आज देखील पावसाचा अलर्ट

Pune: मंचर- भीमाशंकर रस्ता वाहतुकीसाठी घोडेगावपासून पुढे बंद

पुणे -

मंचर- भीमाशंकर रस्ता वाहतुकीसाठी घोडेगावपासून पुढे बंद

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे वाहतूक बंद

मंचर- भिमाशंकर रस्त्यावर घोडेगाव ते डिंभे दरम्यान काही ठिकाणी पाणी साचले

डिंभे येथील वाय पॉईंट कडून भीमाशंकरकडे जाताना पोखरी घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या धबधब्यांच्या परिसरात पाण्यासोबत माती , दगड रस्त्यावर वाहून आले

मंचर- भीमाशंकर रस्ता घोडेगाव पासून पुढे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Pune: पुण्यात रात्री पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील अनेक भागांमध्ये झाडं कोसळली

पुणे -

पुण्यात रात्री पावसाची जोरदार बॅटिंग

पुणे शहरातील अनेक भागांमध्ये झाडं कोसळल्याच्या घटना

पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरात जुने वृक्ष कोसळल्याची घटना

काल मध्यराञी शहरात शिवाजीनगर व जंगली महाराज रस्त्यावर मोठी झाडे कोसळली असून अग्निशमन दलाकडून झाड हटविण्याचे काम अद्याप सुरु

सुदैवाने घटनेत कोणीही जखमी नाही

Nashik: नाशिकला पावसाचा ऑरेंज अलर्ट,  वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

नाशिक -

- नाशिकला पावसाचा ऑरेंज अलर्ट

- सकाळी ७ वाजल्यापासून पुढील ३ तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

- रात्रीपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर

- दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी

- प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Yavatmal: पिक कर्ज अडविणाऱ्या बँक व्यवस्थापकांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

यवतमाळ -

पिक कर्ज अडविणाऱ्या बँक व्यवस्थापकांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

सिबिलचा कारणावरून शेतकऱ्याचे कर्ज नाकारणाऱ्या बँकांना नोटीस

खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करण्याचे आदेश असताना जिल्ह्यातील काही राष्ट्रीयकृत बँकांनी सिबिल खराब असल्याचे कारण देत कर्ज देण्यास नाकार दिला.

या प्रकरणातील काही तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या जिल्हाधिकारी विकास मीना यांनी गंभीर दाखल घेतली

बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित शाखांना नोटीस बजावली आहे.

Nashik: नाशिकच्या पंचवटीतील मालेगाव स्टँड परिसरात पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी कोसळली

नाशिक -

- नाशिकच्या पंचवटीतील मालेगाव स्टँड परिसरात पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी कोसळली

- रस्त्यालगत उभ्या असलेल्या चारचाकीवर फांदी पडल्याने वाहनाचे नुकसान

- सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

- पावसामुळे झाडांच्या फांद्या धोकादायक, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Nashik: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांना पावसाचा अलर्ट

नाशिक -

- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांना पावसाचा अलर्ट

- जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

- प्रशासनाकडून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक शाळांना आज सुट्टी जाहीर

- जिल्ह्यातील गड,किल्ले, पर्यटनस्थळांवर देखील पर्यटकांना बंदी कायम

- त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुलं मात्र सप्तशृंगी देवींचं मंदिर ९ जुलैपर्यंत बंदच राहणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG: टीम इंडिया 76 रन्सवर गारद! इंग्लंडविरूद्धच्या लाजीरवाण्या पराभवासाठी हे 5 खेळाडू जबाबदार

Rain Alert: राज्यात आजही अतिवृष्टी, वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज; पुढचे २४ तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नेरळ- भिवपुरीदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी, बदलापूर ते कर्जत वाहतूक ठप्प

Wednesday Horoscope: कौतुक होणार; ५ राशींच्या व्यक्तींच्या पैशांच्या समस्या सुटणार, वाचा आजचे खास राशीभविष्य

सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का! महापालिकेतील नगरसेविकेचं पद जाणार? काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT