Mumbai News Saam tv
महाराष्ट्र

Mumbai News: गोव्‍याहून मुंबईला येत असताना बसमध्येच तरुणीचा मृत्यू

गोव्‍याहून मुंबईला येत असताना बसमध्येच तरुणीचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गोवा येथे राहणाऱ्या तरुणीचा मुंबई येथे येत असताना प्रवासादरम्यान खाजगी बसमध्येच आकस्मित मृत्यू (Death) झाल्याची घटना समोर आली. तमिना आलेम असे 22 वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. (Breaking Marathi News)

तमिना ही आपला मित्र सचिन किट्टू याच्यासोबत मुंबईला येत होती. तीन दिवसांपूर्वी सदर तरुणीचा गोवा (Goa) येथे स्कुटी शिकत असताना अपघात (Accident) झाला होता. या अपघातात तिला खांद्यावरती जखम झाली होती. पुढील उपचारासाठी सदर तरुणीला तिच्या आईने मुंबईला बोलावले होते. यासाठी ती गोव्यावरून मुंबईला येत होती.

तरुणीची हालचाल बंद झाल्‍याने आली शंका

बस नेरुळ येथे आल्यावर तरुणी हालचाल करत नसल्याचे लक्षात आले. यानंतर तरुणीला नेरूळमधील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तरुणी मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान अचानक मृत्यू कसा झाला? याचा अधिक तपास नेरुळ पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ५ मोठ्या मागण्या; जुलैमध्ये होणार मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, ६० दिवसात दिला निकाल

Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

Maternal death: धक्कादायक घटना! इंटरनेटवरील व्हिडिओ पाहून पत्नीची घरातच प्रसूती करण्याचा प्रयत्न, तरुण महिलेचा दुर्दैवी मृत्यू

ट्रेडिशनल टू मॉडर्न, मंगळसूत्राचे लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न, वटपौर्णिमेनिमित्त खरेदी करा

SCROLL FOR NEXT