Navi Mumbai News Saam tv
महाराष्ट्र

Mumbai News: मटणाच्या रश्‍यावरून तुफान राडा; शटर बंद करून तीन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

मटणाच्या रश्‍यावरून तुफान राडा; शटर बंद करून तीन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

मुंबई : नवी मुंबईतील (Mumbai) कोपरखैरणे येथे असणाऱ्या जगदंब ढाबा या हॉटेलमध्ये मटणाच्या रश्यावरून चांगलाच राडा झाल्याचे पहावयास मिळाले. या राड्यात तीस पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी हॉटेल चालकासह तीन जणांविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Letest Marathi News)

झाले असे ही रात्री अकराच्या सुमारास तीन पोलीस (Police) कर्मचारी जेवणासाठी हॉटेल जगदंब ढाबा या ठिकाणी आले. ज्यावेळी मटणावरती ताव मारत असताना त्यांनी मटणाचा रस्सा चांगला नसण्याची तक्रार हॉटेल मालकाला केली. ज्यावरून हॉटेल मालक आणि तीन पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये वादाला तोंड फुटले. पुढे या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

शटर बंद करून बेदम मारहाण

हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी शटर बंद करून तीन पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांनी कोपरखैली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी हॉटेल मालक व त्याच्या तीन साथीदारांवर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणी हॉटेल चालकाची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला असता हे तीनही पोलीस कर्मचारी मद्यपान पिऊन जेवणासाठी आले होते. यावेळी मटनाचा रस्सा हा वेदचा रस्सा असल्याची वारंवार तक्रार करत या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. या झटापटीत ही मारहाण झाली असून यामध्ये हॉटेल चालकाच्या पायाला देखील गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT