samruddhi mahamarg accident news today Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg News : समृद्धी महामार्गावर कोण करतंय दगडफेक? वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण

Mumbai–Nagpur Expressway : समृद्धी महामार्गावरून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Satish Daud

Samruddhi Highway News : मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरून वाहने वेगाने धावू लागली. त्यात अपघाताचे प्रमाण देखील वाढले. आता समृद्धी महामार्गावरून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

महामार्गावरून (Samruddhi Highway) जाणाऱ्या वाहनांवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे. तब्बल दोन ते तीन तास ही दगडफेक सुरू असल्याचं वाहनधारकांनी सांगितलं. या दगडफेकीत काही वाहनांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.

छत्रपती संभाजीनगर ते नागपूरकडे जात असणाऱ्या वाहनावर ३१ मार्चला रात्री १० वाजेच्या सुमारास ही दगडफेक करण्यात आली आहे. महामार्गावरील वनोजा इंटरचेंज परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

अचानक झालेल्या दगडफेकीच्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. या दगडफेकीमध्ये वाहनांचे बरेच नुकसान झाले. या घटनेमध्ये कोणीही दुखापतग्रस्त झाले नाही. दरम्यान, नुकसानग्रस्त वाहनधारकांनी वाहन हेल्पलाइनवर (Police) कॉल केला.

मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संबंधित वाहनधारकांनी आयसी ०९ वनोजा टोल प्लाझा येथे येऊन माहिती दिली. दरम्यान, ही दगडफेक कुणी आणि का केली? याचा शोध पोलीस घेत आहेत. रात्रीचा प्रवास करताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून  (Samruddhi Mahamarg) दररोज हजारो वाहने वेगाने धावतात. उन्हाळा सुरू असल्याने अनेकजण रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र, महामार्गावर दगडफेकीच्या या घटनेमुळे वाहन चालक चांगलेच धास्तावले आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT