Mumbai-Goa Highway Rajapur Accident Saam tv marathi news
महाराष्ट्र

Ganeshotsav : गणपती उत्सवासाठी गावी जाताना भीषण अपघात, १० जण गंभीर; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Mumbai-Goa Highway Rajapur Accident : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जात असताना राजापूरच्या हातिवले येथे फोर्स अर्बेनिया वाहनाचा भीषण अपघात झाला. दुर्घटनेत १० जण गंभीर जखमी झाले असून मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Namdeo Kumbhar

अमोल कलेय, रत्नागिरी प्रतिनिधी

Ganeshotsav travel Mumbai to Konkan : गणेशोत्सवासाठी मुंबईहून आनंदाने गावी निघालेल्या कोकणवासियांच्या प्रवासात विघ्न आले आहे. राजापूर तालुक्यातील हातिवले येथील अंकिता पॅलेससमोर रविवारी सकाळी 'फोर्स अर्बेनिया' या प्रवाशांच्या वाहनाचा अत्यंत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत १० जण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे आणि महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

राजापुरात भीषण अपघात, १० जण गंभीर

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील 'कुणकावळे' येथे जाणाऱ्या प्रवाशांची फोर्स अर्बेनिया गाडी हातिवले येथे आल्यानंतर अपघात झाला. या वाहनात जवळपास १५ जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, त्यातील ८ ते १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आणि जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. राजापूर पोलीस ठाण्याचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

१० तासांचा खडतर प्रवास अन् सीएनजीच्या रांगा

एकीकडे अपघाताची घटना घडलेली असतानाच दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे गणेशभक्तांना ८ ते १० तास उशिराने कोकणात पोहोचावे लागत आहे. त्यातच महामार्गावरील सीएनजी पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या प्रचंड लांब रांगा लागल्याने प्रवाशांचा वेळ आणि संयम दोन्ही संपत चालले आहे.

वर्षभरातून एकदा येणाऱ्या बाप्पाच्या सणासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासातील हे विघ्न काही संप नाव घेत नसल्याने, प्रचंड मनस्ताप सहन करत गणेशभक्त कसेबसे आपल्या गावी दाखल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Diamond Mangalsutra Designs: डायमंडच्या साडीवर उठून दिसतील डायमंडचे मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे ₹६,००० अडकणार? 'हे' १ काम आजच करा, अन्यथा हप्ता बंद

High Court : दारू पिऊन मोठा आवाज करणे गुन्हा ठरू शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचं महत्त्वाचे निरीक्षण

Bigg Boss 20 : पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस'मध्ये लव्हस्टोरी सुरू, सलमान खानही पाहतच राहिला|VIDEO

SCROLL FOR NEXT