ABHIJEET DIPKE DEMANDS GYANESH KUMAR RESIGNATION saam tv
महाराष्ट्र

आता प्रधानांच्या प्रधानचा राजीनामा; अभिजीत दीपकेंची मुंबईतून मोठी घोषणा

Abhijeet Dipke Demands Gyanesh Kumar Resignation Over SIR: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अभिजीत दीपके यांनी केली आहे. SIR यादी फ्रीझ करण्यासह निवडणूक आयोगातील पारदर्शकतेची मागणी करत २ ऑक्टोबरला मुंबईत आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

Omkar Sonawane, Bharat Mohalkar

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अभिजित दीपके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि एसआयआर (SIR) यादी तातडीने फ्रीझ करण्यात यावी, या मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले असून राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा स्पष्ट इशारा दीपके यांनी दिला आहे. याशिवाय, भविष्यात निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी लावून धरली.

पत्रकारांशी बोलताना अभिजित दीपके म्हणाले की, ज्ञानेश कुमार यांनी देशाशी प्रतारणा केली आहे. नैतिकतेचा जराही भाग शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. जर त्यांचा राजीनामा झाला नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करून दिल्लीतील जंतरमंतरवर ठिय्या आंदोलन छेडले जाईल. तसेच आता धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दीपके यांनी केली.

शिवाजी पार्कवर उद्या सीजीपेचे आंदोलन

शिवाजी पार्क येथील गेट नंबर ६ येथे २ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर गोवा, बंगळूर आणि पुढे दिल्लीत आंदोलन असेल. ऑक्टोबरच्या शेवटी जंतर मंतरवर आंदोलन करणार असल्याची माहिती सीजीपेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

CJPचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं आहे. गेल्या १२ वर्षांपासून लोक घाबरत होते, आता लोकं घाबरत नाहीत. लोक घराघरांतून आंदोलनाला येतील, असा दावा अभिजीत दीपके यांनी केला. CJP मूळ विषयापासून बाजूला जाणार नाही. आम्ही मुद्द्यापासून भटकलो तर लोकांनी आम्हाला शिव्या दिल्या तरी आम्ही खाऊ, असंही दीपके यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Forest Cake Recipe: घरच्या घरी बनवा बेकरीसारखी चव स्वादिष्ट व्हाईट फॉरेस्ट केक, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून १८० विमान प्रवाशांचे जीव वाचविण्याऱ्या पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांचे कौतुक

Mens Fitness : पुरुषांनो! वयाची ४५ वर्षे पूर्ण केलीत, 'या' ३ गोष्टी करू शकलात तर समजा तुम्ही आहात फिट अँड फाईन

Pitru Paksha : पितृपक्षात फक्त कावळा नाही तर 'या' प्राण्याला खाऊ घालणं शुभ मानलं जात

Bank Scam : महिला सहकारी बँकेत २४२ कोटींचा घोटाळा! संचालकांसह अनेकांवर गुन्हे, ईडीच्या छापेमारीने महाराष्ट्रात खळबळ

SCROLL FOR NEXT