BMC Saam TV
महाराष्ट्र

Mumbai : कोरोनाची तिसरी लाट, महापालिकेची तयारी तेजीत!

५ जंबो कोविड सेंटरसाठी १०५ कोटींची तरतूद

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिकेने ५ जंबो कोविड केंद्र कार्यान्वित ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या खासगी कंत्राटदाराकडून भाडे तत्वावर प्रचलन व व्यवस्थापन सेवा घेण्यात येणार आहे . पालिका त्याकरिता वैद्यकीय संस्थेला तब्बल १०५ कोटी रुपये देऊ करणार आहे.

हे देखील पहा :

पुढील ३ महिन्यांसाठी अथवा जोपर्यंत कोविडचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत हे कंत्राटकाम खासगी वैद्यकीय संस्थेला देण्यात येईल. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. बीकेसी, दहिसर, मालाड, कांजूरमार्ग आणि सोमय्या या ठिकाणी हे ५ जंबो कोविड केंद्र कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. या ५ जम्बो कोविड केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रुग्णशय्यांची यादी खालीलप्रमाणे :

७४८ अतिदक्षता विभागात रुग्णशय्या

२०९९ प्राणवायुयुक्त रुग्णशय्या

८०१ रुग्णशय्या

१०० बालरोग अतिदक्षता विभाग रुग्णशय्या

१०० बालरोग रुग्णशय्या

२० डायलिसिस ( अतिदक्षता विभाग) रुग्णशय्या,

४० ट्राएज ( अतिदक्षता विभाग)

महापालिका प्रशासन, प्रति यातिदक्षता विभाग रुग्णशय्येसाठी प्रति दिन ६ हजार रुपये, प्राणवायूयुक्त रुग्णशय्येसाठी १ हजार ५०० रुपये तर विना प्राणवायुयुक्त रुग्णशय्येसाठी ८०० रुपये मोजणार आहे .

- बीकेसी कोविड केंद्राचे कंत्राटकाम ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. ( कंत्राट रक्कम ३४ कोटी ५१ लाख रुपये) - दहिसर कोविड केंद्राचे कंत्राटकाम लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस (कंत्राट रक्कम १४ कोटी ०५ लाख रुपये),

- सोमय्या कोविड केंद्राचे कंत्राटकाम अपेक्स हॉस्पिटल मुलुंड या वैद्यकीय संस्थेला (कंत्राट रक्कम ५ कोटी ६३ लाख रुपये),

- कांजूरमार्ग कोविड केंद्राचे कंत्राटकाम मेडटायटन्स मॅनेजमेंट (कंत्राट रक्कम २८ कोटी २३ लाख रुपये)

- मालाड कोविड केंद्राचे कंत्राटकाम रुबी ऍलकेअर सर्व्हिसेस ( कंत्राट रक्कम २२ कोटी ४७ लाख रुपये)

अशा एकूण ५ खासगी वैद्यकीय संस्थांना एकूण १०५ कोटी रुपयांत कंत्राट स्वरूपात देण्यात येणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

Maharashtra News Live Update: नाशिकमधील आदिवासी आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली भेट

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT