Ladki Bahin Yojana Fraud Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana Fraud : 12 भावांचा 'लाडकी'च्या पैशांवर डल्ला! फोटो, आधारकार्ड महिलांचं, अर्ज मात्र पुरुषांचा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेसाठी पुरुषांनी महिलांचे फोटो लावून अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. योजनेचा लाभ मिळावा, यासाठी 12 भावांनी महिलांचे फोटो लावून स्वतःचा अर्ज भरल्याचं महिला आणि बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आलंय.

Girish Nikam

राज्यात सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत रोज नवे नवे गैरव्यवहार समोर येत आहेत. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अनेक भावांनी या योजनेत घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कन्नड तालुक्यातल्या 12 पुरुषांनी महिलांचे फोटो लावून अर्ज भरल्यानं खळबळ माजलीय. महिला आणि बालकल्याण विभागाच्या निदर्शनास हा फसवणुकीचा प्रकार समोर आलाय.

एकीकडे या योजनेच्या श्रेयवादावरुन महायुतीमध्येच शिंदे गट आणि राष्ट्रवादीत वाद रंगलाय. दरम्यान योजनेला खीळ बसावी यासाठी विरोधकांचा डाव असल्याची टीका आमदार संजय शिरसाटांनी केलीय.

यापूर्वी देखील सातारा आणि इतर ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे समोर आलं होतं. सुमारे दीड कोटी गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. योजनेत पारदर्शकता आणणं आणि गैरप्रकार रोखण्याचं मोठं आव्हान सरकारी यंत्रणेसमोर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे संत गजानन महाराज मंदिरात दर्शन

Crime: बॉयफ्रेंडच्या समोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, कार अडवून आधी दोघांना मारहाण, नंतर...

Bank Holiday in March कामाची बातमी! मार्चमध्ये ११ दिवस बँका बंद, RBI कडून सुट्ट्यांची यादी जारी

Holi Hair Care Tips: होळी खेळताना केसांची काळजी कशी घ्यायची?

T20 World Cup 2026: सेमीफायनलची दारं उघडी ठेवण्यासाठी भारतासमोर NRRचं गणित, झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचं स्पष्ट समीकरण पाहा

SCROLL FOR NEXT