Ajit Pawar on Ladki Bahin Yojana  Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद होणार का? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं...

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात बंद होणार का? याचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

अभिजीत सोनावणे

राज्यात निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहिताही लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात, अशा सूचना राज्य सरकारला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार आता महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसेही मिळणार नाही आहे. यातच अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की, ही योजना कायमची बंद झाली आहे का? याचंच उत्तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.

आज नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे एक कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करता अजित पवार म्हणले आहेत की, ''लाडक्या बहिण योजनेचे पैसे सर्वांना मिळत आहेत, माय माऊलीच्या चेहऱ्यावर आनंद आहे. ही योजना बंद होणार नाही. सावत्र भावाचे बटन दाबू नका, आम्ही सख्खे भाऊ आहे, योजनेचे पैसे बंद होणार नाही.''

ते म्हणाले की, ''काम करून घेण्याची धमक असावी लागते, प्रशासनावर पकड असावी लागते. काहींनी आता काढले योजना बंद केली, योजना बंद केली नाही. आम्ही केंद्रातून निधी आणू.''

अजित पवार पुढे म्हणले की, ''राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. मी पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडला नाही, 35 वर्ष काम करतोय. विरोधकांनी महाराष्ट्रची बदनामी थांबवावी. महाराष्ट्र अर्थिक परिस्थिती चांगली नाही, असे म्हणतात. मी अर्थमंत्री आहे,मला माहिती आहे. सत्तेत येण्यासाठी राज्याची बदनामी करू नका.''

पवार म्हणाले, ''लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षे चालू ठेवायची आहे. विरोधक सत्तेसाठी काहीही करतायत.'' दरम्यान, विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर या योजनेचे पैसे पुन्हा लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार असल्याचं, सत्ता पक्षाचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : 'बिग बॉस' शोचे आमिष दाखवून प्रसिद्ध अभिनेत्रीला ११ लाखांचा गंडा, मुंबईत तिघांविरुद्ध गुन्हा

Maharashtra News Live Update: बनावट शालार्थ आयडी प्रकरणात १,१०० पानांचे दुसरे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Lionel Messi: इंग्लंड जिंकणार वाटत असतानाच मेस्सीने फिरवली जादूची कांडी; अवघ्या 7 मिनिटांत मिळवलं फायनलचं तिकीट, वाचा नेमकं काय घडलं?

Beed : विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, उमेश मानेवर बलात्काराचा गुन्हा; विवाहित महिलेशी जबरदस्ती संबंध ठेवले अन्...

Wardha Crime: महाराष्ट्र हादरला! १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या, शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT