Buldhana saam tv
महाराष्ट्र

Sailani Yatra : सैलानी यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज; बुलढाण्यासह अकोला, औरंगाबाद, जालना, जळगावातून अतिरिक्त बस

यात्रे निमित्त एसटी महामंडळाने जय्यत तयारी सुरु केली आहे.

संजय जाधव

Sailani Yatra : कोरोनाचे संकट टळल्यानंतर बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील सैलानी (sailani yatra) येथील यात्रा होणार आहे. यामुळे या यात्रे करिता संपूर्ण देशभरातून भाविक लाखोच्या संख्येने येण्याचा अंदाज बांधला जात आहे.

त्यामुळे भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (msrtc) वतीने अतिरिक्त बसेसची (msrtc bus) व्यवस्था करण्यात आली आहे. चार मार्च ते 16 मार्च या कालावधीत बुलढाणा आगारातून जवळपास दोनशे अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत. (Maharashtra News)

अकोला, औरंगाबाद, जालना, जळगाव यासह इतर जिल्ह्यातून 500 ते 600 बसेस सोडण्यात येणार आहेत. सोबतच प्रवाशांच्या सुविधेसाठी पिंपळगाव सराई, ढासाळवाडी आणि वाघजाळी अशा तीन ठिकाणी तात्पुरते बस स्थानक देखील उभारण्यात आले आहेत अशी माहिती शेषरावं कचवे, डिटिओ, एसटी महामंडळ विभाग, बुलढाणा यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: गुढीपाडव्यासाठी घरच्या घरी तयार करा स्वादिष्ट बालुशाही, वाचा सोपी रेसिपी

Mojtaba Khamenei : युद्धातून सर्वात मोठी बातमी, इराणच्या मोजतबा खामेनींवर तब्बल ८३ कोटींचं बक्षीस

Nashik Tourism : नाशिकमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ, 'या' ऐतिहासिक ठिकाणाहून दिसेल पर्वतरांगांचे मनमोहक दृश्य

Famous Actor : 'बिग बॉस' फेम अभिनेता विकतोय LPG सिलिंडर? किंमत वाचून येईल चक्कर

Maharashtra Live News Update : अमरावती ठरले देशातील सर्वाधिक उष्ण शहर; 41.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT