महावितरणवर कुठलाच कर लादण्याचा महापालिका, नगरपालिकांचा अधिकारी नाही SaamTv
महाराष्ट्र

बारामतीत महावितरणकडून कृषीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू

कोणतीही पूर्वसूचना न देता कृषिपंपाची वीज खंडित केल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बारामती तालुक्यातील सुपे येथील महावितरणच्या उपकेंद्रासमोर ठिय्या आंदोलन केले.

मंगेश कचरे

बारामती : थकीत वीज बिल न भरल्यामुळे महावितरणकडून शेतकऱ्यांचे कृषीपंप वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम बारामतीत तेजीत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता कृषिपंपाची वीज खंडित केल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बारामती तालुक्यातील सुपे येथील महावितरणच्या उपकेंद्रासमोर ठिय्या आंदोलन केले. वीज पुरवठा पूर्ववत होत नाही तोपर्यंत कार्यालयासमोरून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

हे देखील पहा -

एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असताना दुसरीकडे महावितरणने कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता अचानक कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यासाठी ट्रांसफार्मरचा विज पुरवठा खंडित करण्याचे आदेश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिले आहेत.

त्यानुसार सुपे परगण्यातल्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र, वीज बिलाची सवलत मिळावी, तसेच विज बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय असावी, या मागणीसाठी भाजपा नेते दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली आज सुपे येथील महावितरण कार्यालयामोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

SCROLL FOR NEXT