MPSC ने 3 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाबाबत विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी आक्षेप नोंदवले होते.
नर्मूल्यांकनामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची प्रक्रिया लांबण्याची शक्यता
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने(MPSC)राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 3 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि महाराष्ट्र गट-ब(अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2026 या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतलाय.
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 मधील उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाबाबत अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी आयोगाकडे आक्षेप नोंदवले होते. हे आक्षेप विचारात घेऊन आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. अनेक विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थी यांनी आयोगाकडे राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ मधील मुल्यांकनाबाबत आक्षेप नोंदविलेले आहेत. सदर आक्षेप विचारात घेऊन राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिकांचे पुर्नमुल्यांकन करण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे.
दरम्यान, राज्यातील सध्याच्या विविध परीक्षा पद्धतींचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीने राज्यभरातील अनेक परीक्षार्थी आणि संबंधित घटकांशी चर्चा केली असून, विविध उत्तम कार्यपद्धतींचा अभ्यास केला आहे. आदर्श परीक्षा पद्धतीबाबत समितीच्या शिफारशी लवकरच अपेक्षित आहेत.
या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना तसेच काही लोकप्रतिनिधींनी 3 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी निवेदने आयोगाकडे सादर केली होती. यासर्व बाबींचा साकल्याने विचार केल्यानंतर आयोगाने तीनही स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
कथित पेपरफुटीच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलावी आणि परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका नव्याने तयार कराव्यात, अशी मागणी उमेदवारांच्या एका गटाने केली होती त्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतलाय. प्रश्नपत्रिकांची निर्मिती, छपाई, वाहतूक आणि वितरण या संपूर्ण प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत उमेदवारांकडून प्रश्न उपस्थित केले गेलेत. त्यामुळे नियोजित तारखेला परीक्षा घेण्यापेक्षा आधी परीक्षा प्रक्रियेवरील निर्माण झालेला संशय दूर करणे आवश्यक असल्याचे परीक्षार्थी म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.