शिवसेनेवर जर कोण आघात करत असेल तर शिवसेना पुरून उरेल - राऊत  SaamTv
महाराष्ट्र

शिवसेनेवर जर कोण आघात करत असेल तर शिवसेना पुरून उरेल - राऊत

"तुम्ही माझं काही करू शकत नाही, मी पुरून उरलो" नारायण राणे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतील या वक्तव्यावर शिवसेना खासदार विनायक राऊतांचे उत्तर.

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : "तुम्ही माझं काही करू शकत नाही, मी पुरून उरलो" नारायण राणे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतील या वक्तव्यावर उत्तर देताना शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले की, शिवसेनेवर जर आघात करण्याचं काम कोणी केलं तर, त्याला मात्र पुरेपूर धडा शिकवल्याशिवाय शिवसेना गप्प राहणार नाही.

हे देखील पहा -

दिशा सालीया आणि पूजा चव्हाण प्रकरणात मी गप्प बसणार नाही त्या मंत्राला अटक होईपर्यंत आम्ही पाठलाग करणार, कोर्टात पण जाणार असे राणे म्हणाले आहेत. यावर राऊत म्हणाले की, नारायण राणे यांना गप्प राहण्यासाठी कोणीही सांगितलं नाही. कोणत्याही गोष्टी पुढे घेऊन धावायचे असेल तर जरूर धावाव आमच्याकडे सुद्धा कणकवलीतील मचेकरांचा,आणि रमेश गोवेकर, अंकुश राणे, बाळा वळजू खुनाचा संदर्भ आहे. आमच्याकडे सुद्धा खूप मटरेल आहे. त्यामुळे काळजी करू नका जेवढे धावायचं तेवढे धावा एक एक करून प्रकरणे बाहेर काढू.

योगी आदित्यनाथ यांची थोबाड फोडण्याची भाषा कोणी केली होती असा थेट सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नारायण राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे. यावर राऊत म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांच्याबाबत कोणी थोबाड फोडण्याच्या संदर्भात कोण बोललं असेल किंवा मुख्यमंत्री बोलले असतील हे आमच्या वाचनात आलेलं नाही.

ज्यावेळी बोलले होते तर त्यावेळी हे झोपले होते का? तुमच्या अपराधावर पांघरूण घालण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचा संदर्भ देऊन आपली कातडी वाचवायला निघालेल्या हि मंडळी आहेत. दरम्यान, काहीजण माझ्या चांगुलपणाचा फायदा उठवतायत या राणेंच्या वक्तव्यावर राऊत म्हणाले की, नारायण राणे यांच्याकडे चांगुलपणा आहे का हा मात्र संशोधनाचा विषय आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरील खर्चात मोठी कपात; सरकारचे किती पैसे वाचणार? समोर आले नवे आकडे

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये मुसळधार पावसाचा फटका; डहाणू–बोर्डी राज्य मार्ग 60 मीटर वाहून गेला, अनेक गावांचा संपर्क तुटला

कारल्यापासून बनवा कुरकुरीत भजी; चहा सोबत लागेल मस्त

Lower Back Pain: दिवसभर बसून काम करता? झोपण्याआधी १० मिनिटं करा 'हा' उपाय; पाठदुखीपासून मिळेल आराम

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा महामार्गावर भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT